बारामती प्रतिनिधी:-
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची बारामती आज सभा..
बारामती- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांची आज गुरुवार दिनांक 25 एप्रिल रोजी, दुपारी चार वाजता येथील रयत भवन मार्केट यार्ड बारामती या ठिकाणी जाहीर सभा आयोजित केल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव सुनील शिंदे यांनी दिली.
बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ सदरील सभा होणार असून यावेळी महाराष्ट्रचे माजी मंत्री दिलीपभाऊ कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थत राहणार आहेत.
सदरील सभेच्या नियोजनाची बैठकस तालुकाध्यक्ष संजय वाघमारे, शहराध्यक्ष अभिजीत कांबळे , युवा जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र सोनवणे, तालुका सरचिटणीस माऊली कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा साबळे सह सीमा चोपडे, पुनम घाडगे, सीमा घोरपडे, सविता खंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर मोरे, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद खंडाळे, तालुकाध्क्ष साहेबराव खंडाळे, राजेंद्र खंडाळे आदींच्या वतीने सभेचे नियोजन करण्यात आले आहे..