बारामतीतील वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर बारामती तालुका पोलिसांचा छापा; पाच आरोपींना अटक चार मुलींची सुटका..

0
5

बारामतीत भिगवण रोडवरील प्रणव लॉजवर बारामती तालुका पोलिसांचा ‘छापा’

देहव्यापार प्रकरणी पाच जण ताब्यात ; आसाम व पश्चिम बंगालमधील चार महिलांची सुटका

बारामती, दि.०६

  बारामती तालुका पोलिसांनी भिगवण रोडवरील प्रणव लॉजवर छापा टाकत देहव्यापाराच्या अड्ड्यावर मोठी कारवाई केली. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सोमनाथ महादेव खोमणे (रा.सावळ, ता. बारामती), धिरज रामभाऊ जाधव (रा.जालना), सागर संजय सोडबुके ( रा. बारामती), मेराजुल जानीफ अली (रा.गोलपारा,आसाम), अफजल मझीबर रहमान हुसेन (रा.बरपेटा, आसाम) आणि सदाम जुमरुद्दीन हुसेन (रा.बरपेटा,आसाम) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ५ मार्च रोजी सायंकाळी भिगवण रोडवरील प्रणव लॉज येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यातून मिळणाऱ्या पैशांवर उपजीविका चालवित असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

या कारवाईत पोलिसांनी आसाम येथील रहिवासी असलेल्या तीन वय ३०, वय २१, वय २६, आणि पश्चिम बंगाल येथील १ वय २२ वर्षे अशा चार महिलांची सुटका केली.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४३ तसेच स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे करत आहेत. या कारवाईमुळे लॉजिंग व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील धनश्री भगत पोलिस अंमलदार नितीन ढवाण भारत खारतोडे दादा दराडे नीलेश वाकळे सोनाली सूर्यवंशी स्मिता गायकवाड चालक आफरीन शेख विठ्ठल तरंगे यांनी केली आहे.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे बारामती उपविभागात आयोजन
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here