बारामती प्रतिनिधी : विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे ऊर्जा साक्षरता जागरूकता आणि जागतिक हवामान घड्याळ प्रदर्शन आणि वितरण कार्यक्रम यशस्वी संपन्न
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती आणि एनर्जी स्वराज फाउंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने ऊर्जा साक्षरता जागरूकता आणि जागतिक हवामान घड्याळ प्रदर्शन आणि वितरण कार्यक्रम २० जून २०२३ रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात पार पडला. महाविद्यालयाने एनर्जी स्वराज फाऊंडेशन ऊर्जा साक्षरता प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा आयोजित केला होता. महाविद्यालयातील एकूण १३००हून जास्त प्राध्यापक, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी ऊर्जा साक्षरता प्रमाणपत्र पूर्ण केल्याबद्दल एनर्जी स्वराज फाऊंडेशनकडून महाविद्यालयाला ०६ “जागतिक हवामान घड्याळ” भेट म्हणून देण्यात आली.
यापैकी ०४ घड्याळे विद्याप्रतिष्ठानचे व्ही. आय. आय. टी. बारामतीचे प्राचार्य डॉ. आनंद देशमुख, विद्याप्रतिष्ठानचे ऍग्रीकल्चर बायोटेकनॉलॉजिच्या प्राचार्य डॉ. सुमन देवरामथ तसेच डॉ. सायरस पुनावाला स्कुल यांचे प्रतिनिधी अभिजित नगरे, विद्याप्रतिष्ठानचे इंग्लिश मिडीयम स्कुल यांचे प्रतिनिधी वसुंधरा महाडिक, या सर्वाना जागतिक हवामान घड्याळाचे वितरण प्राचार्य. डॉ. आर. एस. बिचकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन रुपाली देवकाते यांनी केले. व्यासपीठावरील प्रमुख अतिथींचा सत्कार महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. एस. बिचकर यांच्या हस्ते करण्यात आला. समन्वयक प्रा. अजिंक्य गोलांडे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सौर ऊर्जा प्रकल्प, सौरऊर्जेचा परिचय, सौरऊर्जेचा वापर, त्याचे फायदे या विषयी इतंभूत माहिती दिली. तदनंतर समन्वयक प्रा. पूजा जैसवाल यांनी जागतिक हवामान घड्याळाची कार्यप्रणाली कशी काम करते या विषयीची संपूर्ण माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी डॉ. निर्मल साहूजी, सेंट्रल टीपीओ विशाल कोरे, प्रसार माध्यम विभागाचे श्री. सुनिल भोसले हे या कार्यक्रमासाठी उपस्थितीत होते. या प्रसंगी विद्याप्रतिष्ठानचे व्ही. आय. आय टी बारामतीचे प्राचार्य डॉ. देशमुख तसेच प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन विद्युत अभियांत्रिकी शाखेचे विभाग प्रमुख प्रा. रोहित तरडे यांनी केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पारपाडण्यासाठी प्रा. रोहित तरडे, समन्वयक प्रा. पूजा जैसवाल, समन्वयक प्रा. अजिंक्य गोलांडे, संतोष मगर तसेच सर्व विभागीय ELT समन्वयक यांनी विशेष परिश्रम घेतले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.