संतोष शिंदे:- बारामती येथे नटराज नाट्य कला मंदिर, श्री सद्गुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूर ,श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांसाठी मोदामृत अभियानाची अजित पवार यांच्या हस्ते सुरुवात….
बारामती : बारामती येथे काल दि.०२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती चे औचित्य साधत, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘नटराज नाट्य कला मंदिर, श्री सद्गुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूर ,श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांसाठी मोदामृत अभियानाची अजित पवार यांच्या हस्ते सुरुवात”….
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आजची मुले हे देशाचे भविष्य आहे त्यामुळे ही पिढी सुदृढ आणि सशक्त असणे गरजेचे आहे . पालकांनी मुलाच्या आरोग्याबाबत दक्ष असणे आवश्यक आहे . बारामती पोषण आहार अभियान सुरू होत असल्याची मनापासून समाधान वाटते.
केंद्र सरकारने कुपोषण मुक्तीसाठी राष्ट्रीय पोषण कार्यक्रम आखला आहे आरोग्य आणि शिक्षणाला महत्त्व देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे त्यासाठी राज्य सरकार विविध कार्यक्रम आखत आहे कुपोषणाच्या वेळाक यातून सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे पोषक आहाराच्या कमतरतेने वेगवेगळे आजार होतात अन्न हे पूर्णब्रह्म आहे शरीराची झीज भरून काढणे कार्यशक्ती वाढवण्यासाठी अन्नाची गरज आहे मुलाच्या चौरस समतोल आहारात पोषक आहार महत्त्वपूर्ण आहे
यामध्ये पोषक घटक पाणी जीवनसत्वाच्या आहाराचा रोजच्या जेवणात समावेश असावा त्यासाठी पालकांनी दक्ष असावे बारामती हे पोषक आहार अभियान सुरू होत असल्याचे मनापासून समाधान आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
कार्यक्रमाचे संयोजक नटराज नाट्यकला मंडळाचे प्रमुख किरण गुजर म्हणाले की मी कोल्हापूरला गेलो असता विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूर यांच्या माध्यमातून सुरू असलेला उपक्रम पाहिला व असाच पद्धतीच्या उपक्रम बारामतीतील सुरू व्हावा मुलांचे आयुष्य सुदृढ बनण्याच्या करिता हा उपक्रम नक्कीच फायद्याचा असल्याचेमुळे त्याची सुरुवात बारामतीतून व्हावी करिता या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आल्याचे किरण गुजर यांनी सांगितले.
तसेच यावेळी आनंद महाराज सांगवडेकर म्हणाले गोदामृत पोषक आहार अभियानाद्वारे सुदृढ बारामती करूया सुरुवात आजच्या दिनापासून झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले यावेळी विविध शाळेतील लहान बालक विद्यार्थी विद्यार्थिनी पालक तमाम बारामतीकर जनसमुदाय , विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते अधिकारी इत्यादींच्या उपस्थिती नटराज नाट्य कला मंडळ येथे मोदामृत अभियानाची सुरुवात व त्याचा शुभारंभ अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडला.