हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड; देशाच्या गुणवत्ता यादीत तिसरे स्थान
बारामती, ता. २० : शालेय जीवनात उंच गगनभरारी घेण्याचे
प्रत्येकच विद्यार्थ्यांचे स्वप्न असते, मात्र, काही मोजकेच विद्यार्थी खऱ्या अथनि यशाला गवसणी घालू शकतात. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी सिद्धी विकास घाडगे हिनेही भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून कार्यरत होत ही गगनभरारी घेतली आहे.
सिद्धी घाडगे हिने एअर फोर्स कॉमन एंट्रन्स टेस्ट (AFCAT) व एअर फोर्स सिलेक्शन बोर्ड (AFSB) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा व मुलाखतीत चमकदार कामगिरी करून संपूर्ण भारतातून गुणवत्ता यादीत तिसरे स्थान मिळविले.
सिद्धी ही विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेची २०१६-२०१७ या बॅचची दहावीची विद्यार्थिनी आहे. शालेय जीवनात बालपणापासूनच तिने अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने सर्वांना प्रभावित केले होते, प्राथमिक व माध्यमिक विभागात उत्कृष्ट विद्यार्थिनी, सलग तीन वर्षे उत्कृष्ट मैदानी खेळाडू म्हणून शाळेतर्फे तिला गौरविले होते.
बांबू उडी या क्रीडा प्रकारात तिने राष्ट्रीय पातळीवर व राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. क्रीडा
क्षेत्रात तिने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेदरम्यान तिचा गौरव करण्यात आला होता. खेळाबरोबरच सिद्धीला वक्तृत्वाचीही फार आवड आहे. अभ्यासातील तिची
( एनसीसी मध्ये बेस्ट कॅडेट म्हणून निवड होऊनही दिल्लीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधून अगदी ऐनवेळेस माझे नाव वगळले गेले. त्यामुळे त्याच दिवशी दिल्लीला पुन्हा येईन ते एक हवाई दलातील अधिकारी बनूनच येईन, असा निश्चय केला होता. लष्कराच्या दोन परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरही हवाई दलाची परीक्षा देत फ्लाइंग ऑफिसर
बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. ) सिद्धी घाडगे, बारामती
प्रगती उल्लेखनीय होती. दहावीमध्ये तिने ९० टक्के मिळवून विशेष
प्रावीण्य श्रेणी मिळविली होती.
सिद्धीच्या यशात प्राचार्या जॉयसी जोसेफ व शिक्षकांचा मोलाचा सहभाग असल्याचे तिच्या पालकांनी नमूद केले. सिद्धीने मिळविलेल्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. ए. व्ही. प्रभुणे, सचिव अॅड. नोलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त किरण गुजर, डॉ. राजीव शहा, मंदार सिकची व रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी तिचे व पालकांचे अभिनंदन केले.
सिद्धी घाडगे