बारामतीच्या क्रिकेट, हॅन्डबॉल व डॉजबॉल खेळामध्ये KACF इंग्लिश मिडीयम स्कुलच्या खेळाडूंनी घडविला इतिहास…

बारामतीच्या क्रिकेट, हॅन्डबॉल व डॉजबॉल खेळामध्ये KACF इंग्लिश मिडीयम स्कुलच्या खेळाडूंनी घडविला इतिहास

0
168


बारामतीच्या क्रिकेट, हॅन्डबॉल व डॉजबॉल खेळामध्ये
KACF इंग्लिश मिडीयम स्कुलच्या खेळाडूंनी घडविला इतिहास

    KACF इंग्लिश मिडीयम स्कुलचे इयत्ता 9वी मध्ये शिक्षण घेत असलेला चि. पार्थ संतोष शिंदे व कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा चि. साईराज स्वप्नील शेलार या दोघांनी KACF इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये असलेल्या कारभारी जिमखाना क्रिकेट अकॅडमी मध्ये सराव करत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने U-16 वयोगटाकरिता आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) मार्फत दि. 1  डिसेंबर ते 23 डिसेंबर 2023 चे दरम्यान विजयवाडा, आंध्रप्रदेश येथे आयोजित होणाÚया "विजय मर्चंट ट्रॉफी" करिता बारामतीच्या क्रिकेट इतिहासामध्ये प्रथमच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या U-16 वयोगटाच्या संघामध्ये निवड झाली आहे. सदर खेळाडूंना  सचिन माने ,नितीन सामल व विनोद यादव यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले. 
    तसेच KACF इंग्लिश मिडीयम स्कुलचे इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेला आयान मुनीर तांबोळी याने जिल्हा क्रीडा युवक संचालनालय यांच्या वतीने सिन्नर, नाशिक येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय U-17 हॅन्डबॉल स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केल्याने त्याची डिसेंबर 2023 मध्ये सहजपुर, मध्यप्रदेश येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धे मध्ये महाराष्ट्राच्या शालेय हॅन्डबॉल संघामध्ये निवड करण्यात आली तसेच 
     वाराणसी उत्तरप्रदेश येथे झालेल्या 8वी सबज्युनिअर राष्ट्रीय डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धा स्वर्धेमध्ये महाराष्ट्र डॉजबॉल संघामधुन खेळताना   मेहरूनिसा तस्लीम शेख व  ओम संदिप सपकळ यांनी महाराष्ट्रासाठी सुवर्ण पदक मिळविले. सदर खेळाडूंना  पवन धनकर,  महेंद्र मोटघरे यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले. 
     KACF इंग्लिश मिडीयम स्कुलच्या खेळाडूंना  प्रशांत (नाना) सातव , सुनिता शेडगे, (प्रिन्सीपल, KACF इंग्लिश मिडीयम स्कुल) व सर्व विश्वस्त यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य नेहमीच लाभत असल्यामुळे त्यांनी वरील विविध स्पर्धेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केले. त्यांनी मिळविलेल्या भरघोस यशामुळे बारामती पंचक्रोशी व कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष व विश्वस्तांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. 
    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here