“बारामतीच्या औद्योगिक विकासाचे शिल्पकार… धनंजय जामदार (भाऊसाहेब) यांना भावनगरी परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
औद्योगिक क्षेत्रात एक झंझावात निर्माण करणाऱ्या, बारामती एमआयडीसीला नवसंजीवनी देणाऱ्या आणि पवार कुटुंबियाच्या विश्वासाने भारलेले नेतृत्व म्हणजे धनंजय जामदार (भाऊसाहेब) आज यांचा वाढदिवस एक असा दिवस जिथे संपूर्ण उद्योजक व औद्योगिक कुटुंबाने अभिमानाने माण उंच ठेवावी असा दिवस…
भावनगरी परिवाराच्या वतीने त्यांना मनःपूर्वक, दिलखुलास आणि प्रेमळ शुभेच्छा!
धनंजय जामदार (भाऊसाहेब) हे केवळ बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष नाहीत, तर ते बारामतीच्या औद्योगिक स्वप्नांचे वास्तुविशारद आहेत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार, खासदार सुप्रिया ताई सुळे, सुनेत्रा वहिनी व संपूर्ण पवार कुटुंब यांचा विश्वास त्यांनी आपल्या निःस्वार्थ कार्यातून कमावलेला आहे.

“भाऊसाहेब म्हणजे कार्याचा ध्यास, विकासाचा श्वास आणि उद्योजकांचा आधार!”

ते केवळ उद्योगांची उभारणी करत नाहीत, तर उद्योजकांची मानसिक उभारणीही करतात. एमआयडीसीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांपासून ते नवनवीन उद्योग आकर्षित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात भाऊसाहेब कधीच मागे राहत नाहीत. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो उद्योजकांनी आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरवली आहेत.

कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रं, अभ्यासदौरे, नवे प्रकल्प – या सगळ्या गोष्टींना त्यांनी बारामतीत आकार दिला. “एमआयडीसी म्हणजे केवळ उद्योग नव्हे, तर बारामतीचा आत्मा” हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
धनंजय जामदार (भाऊ) हे खऱ्या अर्थाने पवार कुटुंबियांचे खंदे समर्थक, आणि बारामतीच्या विकासयात्रेतील निष्ठावान येरवेळा आहेत.

आज त्यांचा वाढदिवस, या निमित्ताने भावनगरी परिवार त्यांना केवळ शुभेच्छा देत नाही, तर त्यांच्या कार्याला सलाम करत आहे. आपल्या औद्योगिक नेतृत्वातून त्यांनी बारामतीला जागतिक नकाशावर स्थान मिळवून दिले आहे, हे कोणत्याही उद्योजकाने अभिमानाने सांगण्यासारखे आहे.

भाऊसाहेब, तुमचं असं प्रेरणादायी कार्य आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहो! तुमचं आरोग्य चांगलं राहो, तुमची ऊर्जा कायम टिकून राहो, आणि तुम्ही नवनवीन शिखरं सर करत राहावे,
अशा या प्रखर जिज्ञासू कामाच्या सर्वांचे हित जोपासणाऱ्या व्यक्तिमत्वाला साप्ताहिक भावनगरीच्या वतीने मनःपूर्वक वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…!

