बारामतीकरांचे हिताचे सर्वांगीण विकासात्मक दृष्टिकोन बाळगणारे ‘भावनगरी ” वृत्तपत्राचे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने चौदाव्या वर्षात पदार्पण….!
आम्हाला आमच्यातील पत्रकारिता व एक संपादकीय पूर्णत्वास नेण्यासाठी बळ दिले आहे ते वाचकांनी आमचे मित्र व हितचिंतक, तर आर्थिक परिस्थितीला साथ मिळाली ती खऱ्या अर्थाने आमच्यावर मनातून प्रेम करणारे आमचे जाहीरातदार मायबापानी त्यांच्या शिवाय आम्ही टिकूच शकलो नसतो या जीवघेण्याच्या स्पर्धेत
बारामतीकरांचे हिताचे सर्वांगीण विकासात्मक दृष्टिकोन बाळगणारे ‘भावनगरी ” वृत्तपत्राचे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने चौदाव्या वर्षात पदार्पण….!
जाहीरातदारामुळे टिकून आहोत. तारेवरच्या खेळाप्रमाणे कसरती शिवाय यश संपादन करणे तसे अवघड तर महाकठीणच हो..!..
बारामतीत आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांमुळेच! साप्ताहिक भावनगरी वृत्तपत्राला बळ तर कुठल्याही परिस्थितीत, व यशाचं शिखर पादाक्रांत
करण्याच्याकरिता प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गॉडफादर असणे आवश्यक असते असे म्हणतात आणि आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेले २००९ साली बारामतीच्या नगरीतून सुरू केलेले छोटेसे ‘ भावनगरी” वृत्तपत्र आज मित्तीस तमाम बारामतीकर जनतेच्यापाठिंब्यामुळे व पवार कुटुंबियामुळे त्याचंच कृपेने आम्हाला बळ मिळाल्यामुळे वटवृक्षात रूपांतर करू पाहत आहे. बारामतीतील वाचकांचे मार्गदर्शन तर बारामतीच्या विविध चौका चौकातील
राजकारणातील किस्से हे अतिशय महत्वाचे मुख्यद्वार ठरलेले आहे..! पवारांनी काही दिले नाही, पण त्यांनी पेरलेल्या शेतातून फळे मात्र गोमटी मिळाले त्याचं कारणाने देशातील
विविध राजकीय वर्तुळात शरद पवार हे अग्रेसर तर राजकीय पटलावर बाप माणूस म्हणून विराजमान आहेत, तर अजितदादा कुठेही विकासात्मक कामाच्या माध्यमातून निर्भीड निर्णय, विविध महाराष्ट्रातील त्यांच्या विकसित दृष्टीतुन कसर सोडत नाहीत विविध पवार कुटूंबियांनीही बारामतीसह हळु हळू इतरत्र पाऊले मजबूत टाकत महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती हे केंद्र बिंदू आजवर ठरलेले आहे याचं बारामतीत साप्ताहिक भावनगरी वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही आमचे ध्येय बारामतीच्या सर्वांगीण विकासात्मक पत्रकारितेची कास धरून प्रयत्नशील आहोत आपल्या सर्वाच्या कृपा आशीर्वादामुळेच आज 14 व्या वर्षात भावनगरी वृत्तपत्राचे मोठ्या दिमाखात बारामती नगरीत पदार्पण १४ व्या वर्षात भावनगरी वृत्तपत्राचे पदार्पण बारामतीच्यानगरीत नागरिकांचे आवडते लोकप्रिय जिव्हाळ्याचे ‘भावनगरी”
आज दूरदृष्टीच्या विचारांच सकारात्मक बारामतीकरांचे विकासात्मक दृष्टीने अतिशय सुंदरविचार उपयोगी तर परखडपणे भावनगरी वृत्तपत्रातून बारामतीत बारिक बारीक प्रश्न , समस्या स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीत आणूण देणे विकासात्मक अचूक दृष्टीने लेखणीतून वार्ताांकन करून अनेकदा निवेदने, तर तोंडी नागरी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे प्रशासनास करण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न केला, तेहि केवळ जाहीरातदार, वाचक, हितचिंतक मायबापाच्या आशीर्वादामुळेच आवर्जून नमूद करावेसे वाटले, त्याशिवाय भावनगरी वृत्तपत्र पूर्णत्वास येणे नव्हें । आज भावनगरी वृत्तपत्रांने एक तपहून आधिककाळ म्हणजे १३ वर्ष पूर्ण करीत आज (१४ )चौदाव्या वर्षात दिमाखाने पदार्पण करून बारामती नगरीच्या नागरिकांचे गळ्यातील ताईत बनलेले आहे..!
आम्ही आमच्या वृत्तपत्रातून सामाजिक प्रश्न, न्याय, मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार अश्येयाचे सदर कायमस्वरूपी ठेवलं, अनेकांनी नावे ठेवली, अनेक वेळा मानापमानही झाला तर कधी आदरसत्कारही झाला, पण पैसे कमावणे हे लक्षात आलंच नाही कोनाविरुद्ध कधी जाणून बुजून सूडबुद्धीने वृत्तपत्र चालवले नाही म्हणून अनेक ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांनी दाखवलेल्या सुचवलेले प्रश्न समस्या प्राकर्षाने स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले काही वेळा अधिकारी लोकांच्या रोषाला ही सामोरे जावे लागले तर कधी काही ठिकाणी अधिकारी लोकांनाही आमचा हेवा वाटावा असेच लिखाण केले म्हणून अधिक उत्साहही वाढल तर लेखणीत कधीही तडजोडी केल्या नाहीत म्हणून काही त्या लोकांपासून दूर राहून त्यांच्यात मिसळणे नको? तर मनमिळाऊ स्वभावामुळेच अनेकांना लहानां पासून थोरामोठ्या पर्यंत आम्ही आमची तेरा वर्षात ओळख निर्माणकरू शकलो आता चौदाव्या वर्षात पदार्पण केलं हेचं आमचं बारामतीत मोठेपण म्हणावं लागेल..!
बारामतीत पत्रकारिता करीत, भावनगरी वृत्तपत्र कसे दर आठवड्याला प्रकाशित करण्यात येईल यांवर आमचे तळमळीने प्रयत्न आजवर राहिलेले आहे..!
बारामतीत गेल्या कित्येक वर्षापासून राजकीय पटलावर पवार कुटूंबाचे प्रभूत्वकायम राहिलेले आहे, तर पवारांनी कायम विकसित बारामती कशी करावी, राहील यांसाठी ते प्रयत्न अहोरात्र करतं आहेत, हे येथील प्रत्येक नागरिक छातीठोकपणे सांगू शकतो.. काल व आजही आदरणीय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनातून सूचनेनुसार बारामतीत सर्वागीण विकासासाठी प्रयत्न सुरू आहे, तर मा.उपमुख्यमंत्री विरोधीपक्षनेते अजितदादाची विकासाची भूक कायम तर त्याच भूमिकेत वेळोवेळी दादांनी पुणे जिल्हा विकासासाठी पालकत्व स्वीकारून पालकमंत्री म्हणूनही जोरदार सुपरफास्ट झपाटलेल्या प्रमाणे धेय ठेवुन धोरणात्मक,, धडाकेबाज निर्णय संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे विकासाचे आ.दादा तर सुप्रियाताई खासदार होऊन खेड्यापाड्या पासून शहरापर्यंत विकास झाला तर सर्वच तालुक्यातील सर्व वाड्या-वस्त्यांमध्ये विकास झालेला दिसून येत आहे, तर मूलभूत सुविधा करिता कायम नेते तत्परतेने, तितक्याच तात्पर्याने एक एक विशेष काळजीत पुढील पन्नास वर्षेसाठीचे विकासात्मक कामे पूर्णत्वास येऊ लागलेले आहेत.
या विकासात्मक कामाकरीता विशेष प्रेरणा मिळावी करिता भावनगरी चे लिखाण राहिलेले आहे, कायम पवार साहेब अजितदादा, सुप्रियाताई आणि संपूर्ण पवार कुटुंब याचेही योग्य प्रकारे मार्गदर्शन, प्रेरणा मिळालेले तर बारामतीच्या नागरिकांच्या शुभेच्छा शुभ आशीर्वाद राहिलेले आहेत. बारामतीत अजून काय नाही, काय अपेक्षित आहे स्थानिक नागरिकांच्या वतीने नागरिकांच्या मूलभूत प्रश्न व विकासात्मक दूरदृष्टी उपस्थित करीत आमच्या माध्यमातून प्रामाणीक प्रयत्न भावनगरीतून राहिलेला आहे.. हेच आमचे आपल्या सर्वाच्या तमाम बारामतीच्या आशीर्वादमुळे यश म्हणावे लागेल..!