बदला,पुरचा एन्काऊंटर….

0
54

बदला,पुरचा एन्काऊंटर

बरे झाले एकदाचा अक्षय शिंदेंचा झाला शेवट!

अक्षय शिंदे होताच मतीमंद अन स्री लंपट!

आता राजकारण्याची सुरू झाली चर्चा उलट सुलट!

अजुन जागे व्हायचे आहे मानवी हक्कांचे कमिशन ह्युमन राईट!

काळाच्या पडद्या आड जातील बालिकेवरचे अत्याचार, आरोप प्रत्यारोप होतील बेछुट!

विरोधक करता आरोप सत्ताधाऱ्यांची अवस्था जसे शेळीच शेपुट!

ना अब्रु झाकता येत ना उडवले जातात माशा ऐकावी लागते विरोधकाची वटवट!

आपली राज्य व्यवस्था ब्रिटिशा परीस आहे बळकट!

आरोपींचा एन्काऊंटरच करुन टाकला थेट !

नको वकिल नको साक्षीदार नको कोर्ट कचेरीच झेंगट!

पहा ना राव आरोपी एक पोलीस चार तरी होते झटापट!

आरोपीच्या हातात बेडी तरी हिसकावतो पिस्तोल इतके पोलीस नेभळट!

पोलीस खात्यात भरले पाहिजे आता पोलीस धडधाकट!

अक्षयला मारल्यान प्रश्न निर्माण होतो आड लपला तर नसेल लिंग पिसट!

शिंदेचा टांगा केला पलटी संस्थेचे घोडे फरार चालकांची किती असेल वट!

सामान्य माणसाला प्रश्न पडतो कसा हा राजकारणाचा सारीपट!

वाजते राजकारण्याची डबल ढोलकी माझीच चित,माझीच पट!

एन्काऊंटर म्हतारी मेल्याच दुःख नाही काळ डोकावला जाईल सुसाट!

उद्या सत्याचा लढा देणाऱ्याला हि यम सदनी पाठविले जाईल बिनबोभाट!

असंच चाललं तर राजकारण्याची ठोकशाही लावेल लोकशाहीची वाट!

वाटले ब्रिटिश गेले सुवर्ण युगाची देशात होईल पहाट !

परी बेबंदशाही राजकारण्यानी केला अंधार दाट!


आण्णा धगाटे

जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here