बँकांनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजनेचे उद्दिष्ट २८ मार्चपूर्वी पूर्ण करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

0
14

बँकांनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजनेचे उद्दिष्ट २८ मार्चपूर्वी पूर्ण करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, दि. ४: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचे २०२४-२५ या कालावधीतील उदिष्ट सर्व बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करत येत्या २८ मार्चपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

या योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकांचे झोनल मॅनेजर यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी योगेश पाटील, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती अर्चना कोठारी यांच्यासह विविध बँकांचे क्षेत्रीय व्यवस्थापक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, या योजनेचे पुणे जिल्ह्यात केवळ ३८ टक्के उद्दिष्ट साध्य झाले असून ही बाब योग्य नाही. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे. सर्व बँकांनी त्यांना दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here