प्रतिनिधी:- फ्रान्स येथील शेती अभ्यासकांचा सावंतवाडी/ गोजुबावी गावामध्ये SPK शेती अभ्यास दौरा
शनिवार दि. 9/3/2024
फ्रान्स वरून Farmers Dialogue International – (FDI) या जागतिक संस्थेचे 11 शेतकरी सदस्य व MRA PACHGNI या संस्थेचे 5 शेतकरी सदस्य शिवार फेरीसाठी
श्री. गोरख आनंदराव सावंत यांच्या SPK शेतावर आले होते. त्यावेळी त्यांनी श्री. मिलिंद वाल्मिक सावंत यांच्या देशी / गावरानी बियांच्या बीज बँकेला देखील भेट दिली.
या भेटीमध्ये त्यांनी पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर कृषी (SPK) तंत्र व या नैसर्गीक शेती पद्धती मधे भारतीय देशी गाईचे महत्व या विषयी सखोल माहिती घेतली. पुढे फ्रान्स मध्ये जाऊन या SPK शेती पद्धतीचे प्रयोग करणार असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी समींद्राताई देशी गावरानी बीज बँकेची पाहणी करुन 150 प्रकारच्या भाजीपाला बियांची माहिती घेतली.
या शिवारफेरी साठी FDI व MRA- PACHGNI या संस्थेचे बारामती मधुन भारताचे सदस्य व ज्येष्ठ नागरिक निवास चे संचालक श्री अभय शहा यांनी नियोजन केले होते.
या परदेशी शेतकरी अभ्यासकांनी या शेती पद्धती ची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी सावंतवाडी गावातील व बारामती नॅचरल SPK शेतकरी ग्रूपचे इतर शेतकरी उपस्थित होते. श्री. प्रसाद घोंगडे यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मराठी भाषेचे इंग्रजीमध्ये भाषांतर करुन अभ्यासकांना माहिती दिली.