प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत परिसंवाद व जनजागृती शिबीराचे आयोजन

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत परिसंवाद व जनजागृती शिबीराचे आयोजन

0
104

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत परिसंवाद व जनजागृती शिबीराचे आयोजन

योजनेचा लाभ सर्व कारागीरांपर्यंत पोहोचविण्याचे अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांचे आवाहन

पुणे, दि. १: केंद्र शासनाची प्रधानमंत्री विश्वकर्मा ही तळागाळातील ग्रामीण व शहरी कारांगीरासाठी महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा दुवा असलेले सरपंच, ग्रामीण कारागीर, नगरपालिका, महानगरपालिका कार्यक्षेत्रात काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ग्रामीण व शहरी कारागीरापर्यंत योजनेचा लाभ पोहचविण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी केले.

जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयाच्यावतीने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सरपंच, ग्रामीण कारागीर, नगरपालिका, महानगरपालिका स्तरावर योजनेचे काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित परिसंवाद व जनजागृती शिबीरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

परिसंवादास जिल्हा सह-आयुक्त नगरपालिका प्रशासन व्यंकटेश दुर्वास, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विकास कार्यालय मुंबईचे सहायक संचालक अभय दप्तरदार, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. आर. खरात, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे तज्ज्ञ सदस्य अॅड. धर्मेद्र खांडरे, हरीश परदेशी, विकास जगताप, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आदी उपस्थित होते.

श्री. दप्तरदार यांनी योजनेचा लाभ घेण्याचे अवाहन केले.

यावेळी कारागीर नोंदणीच्या ऑनलाईन प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here