
प्रजासत्ताक दिनी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन
बारामती, दि. २६: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती येथील रेल्वे मैदानावर उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

श्री. नावडकर यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या संचलन पथकाचे निरीक्षण केले. पथकात शहर पोलीस दल, राष्ट्रीय छात्र सेना, नागरी संरक्षण दल, रस्ता सुरक्षा पथक, अग्निशमन दल यांचा समावेश होता. सर्व पथकांनी संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, ‘एमआयडीसी’ चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, निवासी नायब तहसीलदार विलास करे, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी, शहरातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

श्री. नावडकर यांनी उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता झाली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या पथकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्राचे वितरण करण्यात आले.
तहसीलदार गणेश शिंदे यांच्या हस्ते प्रशासकीय भवन येथे ध्वजवंदन

तत्पूर्वी प्रशासकीय भवन येथील प्रांगणात तहसीलदार गणेश शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार विलास करे, तहसील कार्यालय तसेच प्रशासकीय भवनातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
०००