पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा बारामती शहर पोलीस ठाण्याला दौरा, पत्रकारांशी संवाद ….!

0
66

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा बारामती शहर पोलीस ठाण्याला दौरा, पत्रकारांशी संवाद ….!

: प्रतिनिधी- बारामती, दि. १८ मे — पुणे ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल यांनी आज बारामती शहर पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट दिली. पोलीस ठाण्यात दाखल होताच अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. स्थानिक गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली तसेच ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतला.
दुपारी बारामती शहर पोलीस ठाण्यातच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत श्री. गिल यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी पोलीस प्रशासनाच्या भविष्यातील योजना, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली.
“पोलीस व जनतेमधील संवाद वाढवणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल सदैव तत्पर आहे,” असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बारामतीचे स्थानिक गुन्हेगारीवरील नियंत्रण, सीसीटीव्ही नेटवर्कचा विस्तार, तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती श्री. गिल यांनी दिली. या दौऱ्यात त्यांचे बारामती पोलिसांकडून मनःपूर्वक स्वागत करण्यात आले आणि त्यांनी पोलीस ठाण्यातील सुविधांची पाहणी देखील केली.
बारामती पोलीस स्टेशनची इमारत आणि येथील यंत्रणा आधुनिक असल्याचे त्यांनी नमूद करत पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. पोलिसांसाठी मार्गदर्शन आणि प्रेरणादायी विचार पोलीस दलाच्या कामकाजात महत्त्वाचा घटक आहे त्यांनी पोलिसांनी नागरिकांशी अधिक सामंजसपणा कसा साधावा, लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवावा आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करावा, असे सांगितले. यामुळे सकारात्मक प्रभाव पोलीस प्रशासन आणि नागरिकांमधील विश्वास दृढ होण्यास मदत होईल. पोलीस आणि पत्रकार हा एक मध्यस्थी महत्त्वपूर्ण दुवा आहे . पोलीस आणि पत्रकारांच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जाताना कायदा सुव्यवस्था अबाधित राहिले पाहिजे. असेही गिल यांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार ,उपविभागी पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक शहर श्री विकास नाळे ,पोलीस निरीक्षक ग्रामीण श्रीमती वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक वाहतूक चंद्रशेखर यादव ,पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारी व सर्व पोलीस कर्मचारी म्हणून उपस्थित होत. कार्यक्रमाचे आभार बारामती शहर पोलीस स्टेशनचे श्री. नाळे साहेब यांनी व्यक्त केले. बारामतीतील
पत्रकारांच्या वतीने ही श्री. गिल यांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here