पुलवामा ते पहलगाम

0
10

पुलवामा ते पहलगाम

                            माऊली नाचण 

फेब्रुवारी 2019 ला जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे CRPF च्या जवानांच्या वाहनांच्या ताफ्यात दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार आदळवून हल्ला केला त्यात CRPF चे 40 जवान मारले गेले . हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मद या संघटनेने स्वीकारली त्यानंतर काही दिवसातच भारतीय लष्कराने ऑपरेशन बालाकोट राबवत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण स्थळावर एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचेअड्डे नेस्तनाबूत केले . उरीच्या हल्ल्यानंतरची भारतीय लष्कराची ही दुसरी सर्जिकल स्ट्राईक होती . दरम्यानच्या काळात ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केले .
कलम 370 रद्द करण्यामागे जम्मू काश्मीरला अधिक चांगले प्रशासन देण्याचा केंद्राचा दावा होता त्यानंतर
2024 मध्ये जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार येऊन ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले .
केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पूर्वीची परिस्थिती बदलून शांतता नांदेल याची धुसरशी शक्यता वाटत होती पण ती परवाच्या पहलगाम हल्ल्यानंतर नेस्तनाबूत झाली आहे . भारताचे नंदनवन ज्याला म्हणतात तो जम्मू काश्मीरचा स्वर्गीय प्रदेश दहशती कारवायांमुळे नरक यातना भोगताना दिसतोय . पहलगामवरील दहशती हल्ला हा केवळ धर्मावरच केलेला हल्ला नव्हता तर तो मानवतेवर केलेला क्रूर हल्ला होता .
बेछुटपणे गोळीबार करणारे ते अतिरेकी आणि जगण्याची भीक मागणारे पर्यटक एवढे भयानक विदारक दृश्य डोळ्यासमोर दिसले . बेछुटपणे गोळीबार करताना कुठल्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ असा मानवता धर्म या दहशतवाद्यांना का दिसला नसेल !
अवघे सात दिवस लग्न होऊन
अजून हातावरची मेहंदी पण न पुसलेली ती विनय नरवालची पत्नी आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ निश्चलपणे बसुन राहिली ते दृश्य अजुनही अंगावर शहारे आणणारे आहे .
पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यामुळे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या जम्मू काश्मीरवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे .
पाकिस्तान मधील लष्कर ए तय्यबाची शाखा द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे .
भारताने पाकिस्तान बरोबरचे सिंधु पाणी वाटप करारासहित व्यापार वगैरे सर्व करार तोडले आहेत . पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे . वाघा बॉर्डर, अटारी सीमा बंद केल्या आहेत .
पहलगाम मधील हल्ल्यानंतर काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत
1) भारतीय गुप्तचर यंत्रणांना या हल्ल्याची माहिती
अगोदर का मिळाली नाही ?
2) पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये भारतीय जवानांचा
बंदोबस्त का तैनात नव्हता ?
पहलगाम मध्ये पर्यटकांवर जो भ्याड दहशतवादी हल्ला झाला त्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबांना न्याय मिळाला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा !

माऊली नाचण
इंदापूर,जि.पुणे
8668708351

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here