पाऊस एकच पण तो प्रत्येकाला च भासतो वेगळा…
कृष्ण जसा भक्तांना वेगळा..गोपिंना सावळा
मोठ्यांच्या घरी येतो वाजत गाजत..
गरीबांच्या घरी येतो तारांबळ ऊडवत..
गळत असतं छप्पर
भिजत असतं सरपण
कौपरयात पडलेलं म्हातारपण…
होतों तो बेजार..
बुडला असतो रोजगार
पावसाच्या येण्याने उडते दानादान…
भिजले जोंधळे सारें कसं करायचं दळाणं.?
प्रेम विरांना तर हवाच असतो पाऊस..
गारगार वार्यात घालायचा असतो धुडगूस…
विज चमकायचे निमित्तं.. हिला मीठीत जायचे च असते..
म्हणून तर मग ती गालात हसते..
म्हणून तर पाऊस आगळा वेगळा..
बारामती ला वेगळा इंदापूर ला तर वेगळाच
नितीन कुमार शेंडे
बारामती