संपादक : संतोष शिंदे बारामती
‘पवार”वलयकिंत बारामती
राजकीय दृष्टीक्षपात…!
आज वर बारामतीचे राजकारण सर्वदूर परिचित राहिलेले आहे ते शरद पवार ,अजित पवार, सुप्रिया सुळे हे गेल्या निवडणुकीच्या टर्म पर्यंत एकत्रित असत मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकी त्याचपुर्वी साधारण सहा महिन्याच्या काळा उलटला नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला एकमेकांतून विभागून फारकत घेऊन पक्ष स्वतःचा असा दावा करत अजित पवार यांनी पक्षाचे चिन्ह व पक्ष स्वतःकडे ठेवत एकनाथ शिंदे गट निर्मिती होऊन शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी वर दावा करत बारामती सह सर्व महाराष्ट्रासाठी अचंबित करणारा त्यांचा तो निर्णय ठरला.
2024 मध्ये नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत एकमेकातून विभागून वेगवेगळ्या वाटा काढीत
पवार राजकारणात विभागलीयत मात्र कुटुंबीयाची घडी मात्र एकत्रित ठेवली आहे.
असे ते राजकारण व कुटुंब वेगवेगळे आहे असे वारंवार सांगत आहेत हे न सुटलेलं नागरिकांच्या पुढे एक प्रश्न कोड आहे.
यामुळे जनतेतून संभ्रम कायम राहिलेला आहे तो की…दोन पवारांच्या विभागणीतून कोणाच्या पाठीशी ठाम कोणी कुठे उभे राहायचे हेच समजत नाहीयं स्थानिकांमध्ये आजही संभ्रम निर्माण…
झालेला दिसून येत आहे. तर बारामतीच्या राजकारणात चर्चाही होत आहे..,!
आजवर लोकसभेत सुप्रिया सुळे विधानसभेत अजित पवार कायम निवडून येत.
हेच समीकरण कायम बारामती मतदारसंघ अनुभवतोय पवार वलयकिं’त बारामती असलेले तालुक्याचे चित्र हळूहळू बदलत चाललेले पहावयास मिळत आहे.
जनतेत मात्र …
आजवर शरद पवार हे बारामतीकरांचे ‘साहेब “म्हणून परिचित आहेत तर अजित पवार हे “दादा’ म्हणून तर सुप्रिया सुळे “ताई’ म्हणून सर्वदूरवर परिचित आहेत.
मात्र बारामतीचे राजकीय बदलाचे समीकरण तयार होऊ लागले ते लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीतून पवार साहेबांवर निष्ठा विश्वास अपार श्रद्धा बारामतीच्या नागरिकांची राहिलेली आहे ते आपण सर्वांनी पाहिले त्याचे चित्र 2024 च्या लोकसभेत दिसले.
परंतु आता अजित पवार यांनी आपली राजकीय “कूस ‘बदलत वेगळी भूमिका घेत भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्याशी युती करत सत्तेत जाऊन सत्ता भोगली.
वारंवार अजित पवारांच्या त्या निर्णयाचे स्वागत तर टीकाही झाली.
त्याचे परिणाम 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दिसतील काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मात्र एकंदरीत बारामतीच्या सर्वांगीण विकास प्रश्नावर आजवर दादांनी बाजी मारलेली असताना राजकारण अजित पवार यांच्या विचाराला पोशिंदा असे असले .
तरी युवा नेतृत्व युगेंद्र पवार यांनी फार अल्पकाळात तरुणाईत आपले वलय निर्मिती केलेले आहे.
वाडी वस्ती शहरातील गल्लोगल्ली फिरून सहज उपलब्ध होणारे तरुणाईचे नेतृत्व म्हणून ही उदयास आहेत.
त्यांच्याकडे अभ्यासू शिकण्याची वृत्तीमुळे जनाधार मिळवत ते आजच्या 2024 विधानसभेसाठी उमेदवारी सिद्ध केलेली आहे.
ते आज काका अजित पवार यांचे ते प्रतिस्पर्धी ठरलेले आहेत.
आता काका पुतण्याची लढाई अटळ समजली जात आहे.
हेही पाहणे आवश्यक वाटत आहे की लोकसभेच्या वेळी सुप्रिया सुळे यांना मिळालेले शरद पवार साहेबांचे आशीर्वाद , सहानुभूतीलाट
विधानसभेचे निश्चित समजले जाणारे उमेदवार यूगेंद्र पवार यांना मिळणार ?
बारामतीच्या सर्वांगीण विकास प्रश्नावर आजवर अजित दादांनी बाजी मारलेली असताना …मात्र विरोधकांकडून त्यांच्यावर आरोप झाले.
टीकास्त्र आरोपाला घाबरून त्यांनी विचार बदललां..आणि सत्तेत समाविष्ट झाले.. एवढाच त्यांच्यावर राजकीय टपका ठेवला जात आहे.
. येणाऱ्या काळात मतदार जनता कोणाच्या पाठीशी उभे ठाकणार विधानसभेच्या निवडणुकीनंतर चित्र स्पष्ट होईल तोवर वाट पाहावी….