पत्रकारांनी स्वत:सोबतच अन्नदात्या शेतकऱ्यांच्यांही प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे….प्रकाश पोहरे

0
205

पत्रकारांनी स्वत:सोबतच अन्नदात्या शेतकऱ्यांच्यांही प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे….प्रकाश पोहरे

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा व स्नेहमिलन मेळावा संपन्न

अतिथी आणि राज्यस्तरीय बॉक्सरपटू संजना उबाळे व युवा प्रबोधनकार आदित्य इंगळे सन्मानित

अकोला- “आभाळ फाटलेले असतांना रोज रोज ठिगळं लावायची कुठे” अशी परिस्थिती निर्माण झाली असून दररोजच्या नव्या समस्या निर्माण करणाऱ्या शासनाचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष नाही.गेल्या १०० दिवसांत १६०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यात विदर्भातील १४०० आहेत‌.म्हणून पत्रकारांनी स्वत:च्या न्याय्य हक्कांसाठी लढा देतांनाच अन्नदात्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लिहून त्यांच्या समस्यांना वाचा फोडली पाहिजे असे आवाहन दै.देशोन्नतीचे मुख्य संपादक व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय संघटन तथा संपर्क प्रमुख,ईलनाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रकाशभाऊ पोहरे यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या २६ वा विचारमंथन व स्नेहमिलन मेळावा स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रो मध्ये संपन्न झाला.त्यावेळी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते.पर्यावरण मित्र ,सेवाव्रती विवेक पारसकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते‌.संघटना अध्यक्ष संजय देशमुख यांनी विविध उपक्रमांची आणि आगामी अधिवेशनाच्या आयोजनाची माहिती दिली.

    सर्वप्रथम संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम‌.देशमुख यांचे अध्यक्षतेखाली लोकस्वातंत्र्यची व्दितीय वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप खाडे,सचिव राजेन्द्र देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व समाजोध्दारक गाडगे बाबा यांना वंदन आणि अभिवादन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.




         या सभेत पत्रकारांचे विविध प्रश्न,जाहिरात धोरणातील विसंगती,निमशासकीय संस्थांमधून जाहिरात वितरणात न पाळले जाणारे रोस्टर,वृत्तपत्र पडताळणीच्या जाचक अटी,पत्रकारांच्या कल्याण योजना आणि सर्व निर्णयासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापनेचा प्रलंबित प्रश्न, इत्यादी अनेक बाबतीत आणि रेल्वे प्रवासाच्या सवलती परत चालू करण्याच्या प्रश्नावर चर्चा करून काही निर्णय घेण्यात आले.त्याप्रमाणे याबाबत शासनाकडे प्रकर्षाने मागणी करण्याचे यावेळी‌ ठरविण्यात आले.याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकारी नियुक्तीपत्रे व ओळखपत्राची वितरण करण्यात आले.




             याप्रसंगी प्रकाशभाऊ पोहरे यांना संघटनेचे नियुक्तीपत्र शाल ग्रामगीता आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.विवेक पारसकरांसोबतच विविध क्षेत्रातील अग्रेसर व्यक्ती आणि समाजातील युवकांना प्रोत्साहनात्मक बळ देणाऱ्या लोकस्वातंत्र्यकडून दोघांचा सन्मान करण्यात आला.यापैकी राज्यस्तरावरील कांस्य आणि सुवर्णपदक विजेती नया अंदुरा येथील बॉक्सरपटू कु.संजना उमेश उबाळे,व निमकर्दा येथील युवा प्रबोधनकार आदित्य सुहास इंगळे यांचा सन्मानपत्र,ग्रामगीता आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छांसह गौरव करण्यात आला.

जिल्हा मार्गदर्शक पदाधिकारी मनोज देशमुख यांचे संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला केन्द्रीय पदाधिकारी प्रा.डॉ.संतोषजी हुशे,सुरेश पाचकवडे,अंबादास तल्हार,सौ.जया भारती,सिध्देश्वर देशमुख,विजयराव देशमुख,तसेच अरविंदराव देशमुख,प्रकाशराव देशमुख (नागपूर) रावसाहेब देशमुख,गजानन जिरापूरे,धनराज खर्चान (अमरावती) पंजाबराव देशमुख,रामराव देशमुख(खामगाव) अनिल पाटील,सचिन पाटील(जळगाव जामोद) के.व्ही.देशमुख,अॕड. नितीन धूत,विजयराव बाहकर,मधुसुदन मानकर,नंदकिशोर तायडे,प्रा.सुरेश कुलकर्णी,विवेक मेतकर,सागर लोडम,सतिश देशमुख अशोक सिरसाट,मनोहर मोहोड,दिलीप नवले,सुरेश भारती,सौ.किर्ती मिश्रा, सौ.दिपाली बाहेकर,सौ.निता पंड्या,रविन्द्र देशमुख,पंकज देशमुख,गणेश देशमुख,धम्मपाल तायडे,सुहास इंगळे,विष्णू नकासकर,संतोष मावळे, व अनेक पत्रकार उपस्थित होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.आभारप्रदर्शन सचिव राजेन्द्र देशमुख यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here