बारामती : देशातील सर्वांगीण पत्रकारांचे प्रश्न, सोडवण्याच्या करिता मी कटिबद्ध – रामराजे निंबाळकर
बारामती : काळानुरूप बदललेली पत्रकारिता वास्तवाच्या पलीकडे बदलत्या पत्रकारितेच्या स्वरूपामुळे टीआरपी वाढवण्याच्या नादात लोकशाहीला धोक्याची घंटा लोकशाहीचा कुठेतरी खरा स्तंभ ढळमळीत चालल्याचे दिसून येत आहे त्यामुळे लोकशाहीतील ते तीन उर्वरित खांब शाबूत राहतील असे वाटत नाही करिता चौथ्या खांबाने आपली जबाबदारी समजून आपल्यातील त्या खऱ्या पत्रकारांची खरी पत्रकारिता वास्तववादी पत्रकाराने कसे सडकून टीकेचे लिखाण करणारा चुकत असणाऱ्या मग ते आम्ही का असो कोणावरही लिहू शकणारा पत्रकार आजच्या सर्वसामान्य लोकांना अपेक्षित आहे . असे वक्तव्य
श्रीमंत रामराजे निंबाळकर महाराष्ट्र विधान परिषद सदस्य यांनी फलटण येथील आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले .
ते पुढे बोलताना म्हणाले की पत्रकारांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी ‘इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल ही संघटना अडचणीवर मात करीत संपूर्ण देशभर कार्यरत असून कलकत्ता ,दिल्ली पासून फलटण पर्यंत पोहोचलेल्या ‘इरा ‘ला मदतीसाठी सदैव तयार असल्याची ग्वाही श्रीमंत रामराजे निंबाळकर महाराष्ट्र विधान परिषद सदस्य यांनी फलटण येथील कार्यक्रमात बोलताना सांगितले “ते आयोजित
फलटण येथील ‘ लक्ष्मी विलास पॅलेस ‘ येथे इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण सोहळ्याप्रसंगी पदग्रहण केलेल्या ‘इरा ‘ ची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सत्कार कार्यक्रमात व सातारा जिल्ह्यातील पत्रकारांसमोर बोलताना रामराजे निंबाळकर यांनी केवळ पत्रकारांच्या नेमक्या समस्या सोडवण्यापुरतेच मर्यादित न राहता व्यापक स्वरूपात कार्य करावे
असे आवाहन यावेळी इराच्या पदाधिकाऱ्याचे पदग्रहन समारंभ प्रसंगी दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी केले.इंडियन रिपोर्टर असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली च्या महाराष्ट्रातील प्रदेश कार्यकारणी सदस्य व सातारा जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी माननीय श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्या कृष्णा निवासस्थानी झालेल्या छोटे खाणी कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन साप्ताहिक पडसादच्या संपादिका डॉ. प्रा. उज्वला शिंदे यांनी केले यावेळी कार्यक्रमाची प्रास्ताविक संजय कुमार कोटेचा इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी केले कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख म्हणून डॉक्टर उज्वला शिंदे यांना रामराजे यांच्या हस्ते ओळखपत्र प्रमाणपत्र देण्यात आले नंतर साप्ताहिक भावनगरी चे संपादक संतोष शिंदे यांची इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी निवड झाल्या बद्दल त्यांना ओळखपत्र प्रमाणपत्र नियुक्तीपत्र देऊन रामराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून राजकुमार डोंबे यांनाही नियुक्तीपत्र ओळखपत्र देऊन सत्कार करण्यात आला सातारा जिल्ह्याची कार्यकारणी करत असताना सर्वप्रथम फलटण तालुका अध्यक्ष संदीप कदम मान तालुका अध्यक्ष दिलीप कीर्तने माण तालुका उपाध्यक्ष महादेव काटकर मान तालुका सेक्रेटरी संजय जगताप माण तालुका पीआरओ धवलहोरा मान तालुका समन्वयक उमेश काटकर फलटण तालुका सेक्युरिटी सदाशिव मोहिते फलटण तालुका उपाध्यक्ष विलास इंगळे खटाव तालुका अध्यक्ष विक्रांत येवले आटपाडी तालुका अध्यक्ष महादेव महाडिक खंडाळा तालुका अध्यक्ष निलेश वाळिंबे दौंड तालुका अध्यक्ष निलेश जांभळे इत्यादी मान्यवरांच्या निवडी ओळखपत्र देऊन रामराजे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये इंडियन रिपोर्टर असोसिएशन बद्दल कौतुक करून उज्वला ताईंनी दिल्ली ते गल्ली ईराचे नाव आणल्याबद्दल रामराजेंनी त्यांचे कौतुक केले यावेळी आपल्या मनोगत व्यक्त करताना रामराजेंनी इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या प्रत्येक कार्याला शुभेच्छा देऊन त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले नंतर उज्वला ताईंनी आभार मानले यावेळी प्रमुख उपस्थिती परभणी जिल्हा अध्यक्ष मदनबापू कोल्हे परभणी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख देवानंद वाकडे हिंगोली जिल्हा अध्यक्ष उत्तम धायजे कागल अध्यक्ष पुजारी हे उपस्थित होते तसेच ऑल रजिस्टर न्युज पेपर असोसिएशन महाराष्ट्र सचिव व दैनिक प्रगत हिंदुस्थानचे संपादक दीपक ढवळे ही उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतात इंडियन रिपोर्टर असोसिएशन विषयी व पत्रकारांच्या मागण्याविषयी सविस्तर विषय मांडला परभणी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख देवानंद वाकडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले शेवटी फलटण तालुका अध्यक्ष संदीप कदम यांनी आभार मानले यावेळी कागल जिल्हा कोल्हापूर येथील नवोदित पत्रकार व संपादक द कसबा सांगाव टाइम्स चे प्रकाशन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास फलटणमधील ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता लोकमतचे प्रतिनिधी रुद्र भटे डॉक्टर वकील महिला कार्यकर्त्या इत्यादी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे संयोजन इंडियन रिपोर्टस असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री.संजयकुमार कोटेचा व ऑल रजिस्टर्ड न्युजपेपर्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य सचिव श्री. दिपक ढवळे यांनी केले होते. तर या कार्यक्रमासाठी इंडियन रिपोर्टरस असोसिएशनचे श्री.ज्ञानेश्वर जराड (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष), श्री. संतोष शिंदे (महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी), डॉ.उज्वला शिंदे(महाराष्ट्र राज्य प्रसिद्धि प्रमुख), राजकुमार डोंबे (सातारा जिल्हाध्यक्ष), श्री. मदन (बापू) कोल्हे (परभणी जिल्हाध्यक्ष) व श्री. उत्तम धायजे(हिंगोली जिल्हाध्यक्ष) आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अनेक पत्रकार,संपादक मान्यवरांनी आपले मनोगत ही व्यक्त करत सकारात्मक पत्रकारितेची अपेक्षा व्यक्त केली. माध्यम ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजासाठी आरशाप्रमाणे काम करत असतात.इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कुमार कोटेच्या यांच्या हस्ते श्रीमंत रामराजे निंबाळकर विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय कुमार कोटेच्या यांनी आपल्या प्रास्ताविकात सागितले की
इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन ही प्रेस मिडियाची रजिस्टर्ड संघटना असुन या संघटनेला ISO ९००१:२०१५ मानांकन मिळाले आहे. देशपातळीवरील संपादक पत्रकारांची संघटना आहे इरा ही भारतातील सर्वात मोठी पत्रकारांची व्यापक संख्येने असलेली संघटना आहे. विविध पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढणारी ही एकमेव संघटना असून पत्रकारांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणी, प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेचे कार्य संपूर्ण भारतभर तर देशात व प्रदेशात ही या संघटनेचे पत्रकारांच्या बद्दलची कामे सुरू आहेत असे कोटेच्या त्यांनी सांगितले.निलेश वाळिंबे यांनी यावेळी सर्वांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमात देशभरातून पत्रकार बांधव महिला पत्रकार भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन सर्व पदाधिकाऱ्यांना साप्ताहिक भावनगरी च्यावतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा