नेतृत्वाची धुरा संभाळताना कर्तव्य व जबाबदाऱ्या पूर्ण करून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत झटणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार…!

0
408

नेतृत्वाची धुरा संभाळताना कर्तव्य व जबाबदाऱ्या पूर्ण करून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत झटणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार…! सध्याच्या राजकारणावर चर्चा न करणेच बरे तरी पण.. जनतेच्या मनात काय चाललंय तर.. महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी दादांनी आतापर्यंत सांभाळलेल्या खात्यांचा आढावा घेतला असता आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर घेतलेले निर्णय खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर
घेऊन जाणारे आहेत. त्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय लोक हिताचे ठरले आहेत.
‘गावाचा विकास होण्यामागे सर्वाधिक महत्वाची असते तेथील राजकीय इच्छाशक्ती आणि जनतेच्या उत्थानाची तळमळ, बारामतीचे नाव आज राज्याच्या नाही तर देशाच्या नकाशावर आले. त्या मागेही पवार कुटुंबियांची इच्छाशक्ती ही बाब सर्वाधिक महत्वाची आहे. १९६७ नंतर शरद पवार यानी तर साधारण १९९० पासून अजितदादांनी बारामतीच्या विकासासाठी भगीरथ प्रयत्न केले.
सातत्याने विकास हाच केंद्रबिंदू मानून काम करताना अजितदादा यानी गावाचे गावपण हरवणार नाही पण विकासाची प्रक्रिया वेगाने मार्गी लागेल याचा प्रयत्न केला.

वेळप्रसंगी कटूता स्वीकारून निर्णय घेण्याचे धाडस फक्त अजितदादा दाखवू शकतात हे बारामतीकरांनी अनेक वेळेस पाहिलेले आहे बारामतीच्या सर्वांगीण विकासामध्ये योगदान आहे हे प्रत्येक बारामती करायला मान्य करावे लागेल. विकास करताना तो सर्वव्यापी व सर्वांसाठी व्हावा यादृष्टीने त्याचा सातत्याने आग्रह असतो. अजित पवार यांनी सातत्याने सर्व समावेश विकास हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून काम केले लोकप्रियता टाळून व प्रसिद्धीच्या मागे कधीही न लागता त्यांनी आपल्या गावचा चेहरा मोरा बदलण्याचा प्रयत्न केला बारामतीचा परिपूर्ण विकास झाला आहे त्यामागे समाजाचे हित हाच विचार त्यांनी केलेला त्यांच्या कामाच्या माध्यमातून दिसून येतो.

आज बारामतीच्या जो सर्वांगीण विकास जी मॉडेल सिटी दिसते आहे त्यामागे त्यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा महत्त्वाचा ठरतो शासकीय कार्यालयाच्या इमारती कशा कार्यपद्धती असाव्यात हा एक पॅटर्न त्यांनी विकसित केला बारामतीत आल्यानंतर कोणतेही प्रशासकीय कार्यालय पाहिल्यानंतर एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयाचा लुक त्याला दिसतो. हवेशीर, प्रशस्त व सुंदर अशा इमारतीतून शासकीय कार्यालयाचे कामकाज चालते . या सगळ्या बदलाचे शिल्पकार अजितदादा ठरतात. आज बारामतीत आल्याच्या नंतर नवीन प्रशासकीय इमारत, बारामतीची पंचायत समिती, सिल्वर जुबली हॉस्पिटल, महिला हॉस्पिटल, बारामती मेडिकल कॉलेज, बारामती तालुका पोलीस स्टेशन, ऊर्जा भवन, बारामतीचे बस स्थानक, बारामतीचे मार्केट कमिटी, बारामती भिगवन रोड सह विविध गावांना जोडणारे बारामतीचे रस्ते, विद्या प्रतिष्ठानचा परिसर, बारामतीचे एसटी आगार ,आरटीओ कार्यालय वनविभाग ,इमारत, राष्ट्रवादी कार्यालय या सर्व च्या सर्व बोलक्या इमारती दादांच्या विकासात्मक दूर दृष्टिकोनाचा विकासाच्या प्रगल्भतेचा अजितदादांचा खऱ्या अर्थाने परिचय देतात..! व हे सर्व पाहिल्यावर अजितदादा यांच्या विकासाची दृष्टी किती व्यापक आहे याची जाणीव होते शहरातील रस्ते, फॉरेस्ट उद्यान बारामती नगर परिषदेच्या इमारती सह स्टेडियम रेल्वे स्थानक, बस स्थानक या सगळ्याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते शहर स्वच्छ सुंदर व हरित असावे यासाठी सातत्याने ते कार्यकर्ते पदाधिकारी व अधिकारी यांना सूचनाही करीत असतात. नाल्या, केबल, वीज, अंडरग्राउंड, नव्याने अजूनही शिवसृष्टी उभारणे, विविध उद्याने, कऱ्हा नदीचा विकास, शहरातील रस्त्यांची विविध पूलांची कामे पालखी महामार्ग शहरात कोठेही अस्तव्यस्त वाटणार नाही याची काळजी शहरात सर्वत्र सुशोभीकरणाचे शहर याबाबतचे शिस्त असो त्यांनी खऱ्या अर्थाने बारामतीच्या शहराला सौंदर्य बहाल केले असे म्हटले तर वावघे ठरू नये.

तर तालुक्यातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील कोणाचे योग्य काम तातडीने फोनवरून सूचना देऊन ती मार्गी लावण्यास ही दादांचा हातखंड आहे प्रशासनावर मजबूत पक्कड असलेले व तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखण्याचे कसं असलेले हे नेतृत्व उद्याचे उत्तम प्रशासकीय कौशल्याची चुणूक त्यांनी बारामती सह संपूर्ण महाराष्ट्रात ते विख्यात तर आहेतच पण त्यांच्या कामाची चुणूक ही त्यांनी दाखवून दिली आहे. राज्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने पुढील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

आज मित्तीला अजितदादाची प्रतिमा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशीच ओळख झालेली आहे.. अशा या उद्याच्या नेतृत्वाला भावी मुख्यमंत्र्याला म्हणजेच अजित दादा पवार साहेब यांना साप्ताहिक भावनगरीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here