प्रकाशाच्या नादात
अंधारावर प्रेम केलेच नाही
पायाखालच्या जमिनीकडे
लक्ष कधी दिलेच नाही
नक्की काय हव आपल्याला
हे पक्क करण्यात जिंदगी गेली
पायाखालच्या जमिनीशी
नकळतच बेईमान झाली
अंधाराच्या कुशीतच
असतो नीरव प्रकाश
पाया जमिनीशी घट्ट झाल्यावरच
मिळत स्वतःच आकाश
हे सर्व कळण्यासाठी
आयुष्याची मात्रं झाली
थकल्याभागल्या मनानी
क्षणातच हार मान्य केली
आयुष्याच्या संध्याकाळी
वाट अंधाराची पहाते
घेऊन अंधाराला उराशी
प्रकाशात अखंड नहाते
राधिका जाधव – अनपट, इंदापूर