
धाकटे पंढरपूर विठ्ठलवाडीत आषाढी एकादशीची भव्य यात्रा उत्साहात – हजारो भक्तांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन..!
पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धाकटे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी (ता. दौंड) येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात यात्रा हजारो भाविकांनी याठिकाणी हजेरी लावून श्री विठ्ठल आणि माते रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ
दुपारपासूनच संपूर्ण विठ्ठलवाडी परिसर भजन, कीर्तन आणि हरिनाम संकीर्तनाने गजबजलेला होता. मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता. ठिकठिकाणी महिला मंडळांचे कीर्तन, लहान मुलांचे ‘जम्पिंग जपान’, महिलांसाठी विशेष वस्तू व सौंदर्यप्रसाधनांची दुकाने, फराळाचे स्टॉल्स अशा विविध आकर्षणांनी वाडी परिसर उत्सवमय झाला होता.




गावातील प्रमुख मार्गांवर भाविकांची आणि वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. “पंढरी अवतरलीय इथेच” हे शब्द खरे ठरावे, असे साक्षात पंढरपूरचेच दर्शन विठ्ठलवाडीत घडत होते. भक्तांच्या मुखातून “पुंडलीक वरदा हरि विठ्ठल” चा जयघोष अखंडपणे घुमत होता.
या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे स्थानीय ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागासोबतच भक्तांचा भक्तिभाव, ज्यामुळे संपूर्ण परिसर एक आध्यात्मिक आणि मंगलमय वातावरणात न्हालेला होता.
विठ्ठलवाडीतील यात्रा ही केवळ एक धार्मिक सोहळा नसून, पंढरपूर न जाता घरच्या घरी जवळ च विठोबा अनुभवण्याची संधी आहे, असे अनेक भक्तांनी सांगितले.