दौंड विधानसभा मतदारसंघात गृहमतदानासाठी तीन पथके नियुक्त

0
11

दौंड विधानसभा मतदारसंघात गृहमतदानासाठी तीन पथके नियुक्त

पुणे, दि. 12: दौंड विधानसभा मतदारसंघातील ८५ वर्षे वयावरील ६२ ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग २१ अशा एकूण ८३ मतदार असून या मतदारांचे मतदान नोंदविण्याकरीता गृहमतदानासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली आहे.

दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये १४ व १५ नोव्हेंबर दरम्यान ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना घरुनच मतदान करता येणार आहे. वय ८५ वर्ष व त्याहून अधिक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्या मतदारांनी त्यांच्या मागणीप्रमाणे ही सोय करण्यात आली आहे. गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये एक मतदान अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, व्हिडीओग्राफर, पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. तर गृहमतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दौंड तहसील कार्यालयात प्रशिक्षण सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेलार, टपाली मतदान समन्वय अधिकारी प्रशांत काळे, दिनेश अडसूळ यांनी प्रशिक्षण दिले, अशी माहिती माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here