देशाच्या शेतीच्या भविष्याची दिशा दाखवणारे बारामतीत १७ ते २४ जाने.२०२६ रोजी कृषी प्रदर्शन : राजेंद्र (दादा)पवार

0
7

देशाच्या शेतीच्या भविष्याची दिशा दाखवणारे बारामती कृषी प्रदर्शन : राजेंद्र पवार
बारामती | प्रतिनिधी
देशातील शेतीच्या भविष्याची दिशा ठरवणारे आणि शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी मैलाचा दगड ठरणारे बारामतीचे ११ वे भव्य कृषी प्रदर्शन येत्या १७ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील तब्बल १७० एकर प्रक्षेत्रावर आयोजित करण्यात येणार आहे.
गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने भरवले जाणारे हे प्रदर्शन केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी संस्थांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटनमहाराष्ट्र राज्याचे गव्हर्नर आचार्य देवरल माझी देशाचे कृषिमंत्री शरदचंद्र पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत दरवर्षी अडीच ते तीन लाखांहून अधिक शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात. वाढती गर्दी आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना सखोल माहिती मिळावी, यासाठी यंदा प्रथमच हे प्रदर्शन सलग आठ दिवस आयोजित करण्यात आले आहे.
ही माहिती कृषी विज्ञान केंद्र ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
“याची देही, याची डोळा” अनुभव
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे परदेशी तसेच आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष भारतीय जमिनीत वापरून त्याचे परिणाम प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे दाखवले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ माहितीच नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून विश्वासही मिळतो.
AI आधारित शेती : नवी क्रांती
बारामती कृषी विज्ञान केंद्रात देशातील पहिला AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. या प्रयोगामुळे—
ऊस उत्पादन : प्रति एकर २०० टन
खोडवा ऊस : प्रति एकर १५० टन
पाणी, खत व कीटकनाशक खर्चात ५० टक्के बचत
राज्यातील ५,००० शेतकऱ्यांची AI तंत्रज्ञानाद्वारे निवड करण्यात आली
या यशानंतर हे तंत्रज्ञान केळी, डाळिंब, द्राक्ष, कांदा, मका, तुर, कापूस आदी पिकांमध्येही वापरले जात आहे.
मक्याच्या उत्पादनात मोठे यश
KVK बारामतीने विकसित केलेल्या सघन मका लागवड (चिनी मका तंत्रज्ञान) मुळे—
२०,००० हून अधिक शेतकऱ्यांना लाभ
सरासरी उत्पादन : ५० क्विंटल/एकर
आधुनिक पाणी व खत व्यवस्थापनामुळे ७० ते ८० क्विंटल/एकर उत्पादन शक्य
कांदा, फळबागा व भाजीपाला : अत्याधुनिक तंत्रज्ञान
AI आधारित कांदा लागवडीमुळे—
उत्पादन : ३० टन/एकर
५०० ते ६०० ग्रॅम वजनाचा नेदरलँडचा लाल कांदा
८ महिने टिकणारा ‘भीमाशक्ती’ वाण
केळी, डाळिंब, द्राक्ष, पेरू या पिकांसाठी इस्रायल व जर्मनीतील आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात असून एक खोड डाळिंब, बुलेट द्राक्ष आणि निर्यातक्षम पेरूचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे.
हायड्रोपोनिक व सोलर पॉलिहाऊस
कमी जागेत तिप्पट उत्पादन देणाऱ्या—
हायड्रोपोनिक व्हील, NFT, व्हर्टिकल पद्धती
सौर ऊर्जेवर चालणारे पॉलिहाऊस
हँगिंग स्ट्रॉबेरी
लेट्यूस, टोमॅटो, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, पालेभाज्या
यांचे प्रत्यक्ष दर्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे.
नाविन्यपूर्ण पिके व नैसर्गिक शेती
या प्रदर्शनात—
४० प्रकारची वांगी
१५ प्रकारचे भोपळे (४०० किलोपर्यंत वजन)
१५० हून अधिक देशी टोमॅटो वाण
नैसर्गिक शेती, जीवामृत, दशपर्णी अर्क
शून्य मशागत, पीक फेरपालट, गांडूळ खत
एरंडीवर आधारित रेशीम शेती (झरी सिल्क)
यांची माहिती देण्यात येणार आहे.
परदेशी फुलशेतीची झलक
जर्मनीतील २६ रंगांची शेवंती, दीर्घकाळ टिकणारी कट फ्लॉवर्स, सूर्यफूल व इतर निर्यातक्षम फुलपिकांचे प्रात्यक्षिकही या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे.
पशु-पक्षी प्रदर्शन
कृषी २०२६ अंतर्गत डॉ. अप्पासाहेब पवार पशु-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून, यामध्ये शेतकरी, पशुपालक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित नागरिकांना आधुनिक व पारंपरिक शेती पद्धतींचे एकत्रित दर्शन घडणार आहे.
एकूणच कृषी २०२६ हे प्रदर्शन आधुनिक तंत्रज्ञान, देशी वाणांचे संवर्धन आणि एकात्मिक शेती संकल्पनेचा संगम ठरणार असून, शेतकरी व कृषीप्रेमींनी हे प्रदर्शन आवर्जून पाहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here