दुचाकीलाही येणार एअरबॅग,…! अपघातानंतरही वाचणार प्राण …!!

0
143

कार अपघातांपेक्षा दुचाकी अपघातांमध्ये लोकांचा मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. त्याला कारण म्हणजे, कारमध्ये येणारे सेफ्टी फीचर्स. कारमध्ये असणाऱ्या एअरबॅग्समुळे गंभीर अपघातानंतरही कारमधील लोक बऱ्याच प्रमाणात सुरक्षित राहू शकतात. मात्र आता हेच फीचर दुचाकीमध्येही उपलब्ध करण्यात आले आहे.

ऑटोलिव्ह या ऑटोमोटिव्ह सेफ्टी सिस्टीम बनवणारी कंपनी या एअरबॅगची निर्मिती करत आहे. सध्या बऱ्याच दुचाकींमध्ये एबीएस, एएसआर असे सेफ्टी फीचर्स दिलेले असतात. मात्र, त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन ही कंपनी दुचाकींना एअरबॅग देखील बसवण्याच्या तयारीत आहे. यामुळे दुचाकी चालवणाऱ्या व्यक्ती आणखी सुरक्षित असणार आहेत.

गाड्यांना अधिकाधिक चांगल्या दर्जाच्या सेफ्टी सिस्टीम देऊन अधिकाधिक जीव वाचवण्यासाठी ऑटोलिव्ह कटिबद्द आहे. यामुळेच आम्ही असं प्रॉडक्ट तयार करत आहोत जे रस्त्यांवर सर्वात असुरक्षित असणाऱ्या दुचाकींसाठी असेल.” अशी माहिती कंपनीचे सीईओ मिकाएल ब्रॅट यांनी दिली.

कम्प्लीट प्रोटेक्शन
ऑटोलिव्हने दुचाकींचे होणारे अपघात, आणि त्यातून कशा प्रकारे नुकसान होतं याबाबत रिसर्च करून ही सिस्टीम तयार केली आहे. यातून मग कंपनीने दोन सेफ्टी सोल्यूशन सादर केले आहेत. यातील एक म्हणजे ऑन व्हेईकल सेफ्टी, आणि दुसरं ऑन-रायडर सेफ्टी. यातील ऑन व्हेईकल सेफ्टी फीचर 2025 पर्यंत उपलब्ध होईल, असं कंपनीने स्पष्ट केलं.

“परवडणाऱ्या दरात संपूर्ण सुरक्षा देणारी बॅग-ऑन-बाईक सिस्टीम तयार करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. जेणेकरुन बहुतांश दुचाकींमध्ये ही सिस्टीम बसवण्यात येईल.” अशी माहिती कंपनीचे मुख्य तांत्रिक अधिकारी जॉर्डी लोंबार्टे यांनी दिली.

निम्म्यावर आणणार अपघात मृत्यू
जगभरात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण निम्म्यावर आणण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. यासाठी आम्ही सातत्याने रिसर्च करत आहोत. सध्या आम्ही समोरून दुचाकी धडक झाल्यास एअरबॅग कशी फायद्याची ठरू शकते, याचं प्रात्यक्षिक दिलं आहे. इतर प्रकारच्या अपघातांमध्येही रायडरला कशा प्रकारे सुरक्षित ठेवलं जाईल याबाबत रिसर्च सुरू आहे, अशी माहिती कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट सिसिलिया सुन्नेवांग यांनी दिलेली समजते…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here