दीपावली सणानिमित्त शहरात होणाऱ्या गर्दीचे नियोजनासाठी बारामती वाहतूक पोलिसांचे प्रयत्न..
वाहतूक नियोजनासाठी बारामती मधील व्यापाऱ्यांची मीटिंग..
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे..
बाजारपेठेत पेठेत पार पडली नियोजन बैठक
बारामती दि.२२
दीपावली सणानिमित्त बारामती शहरात दरवर्षी खरेदीसाठी लक्षणीय गर्दी होते. या कालावधीत बारामतीसह आसपासच्या तालुक्यातील व पंचक्रोशीतील नागरिक येतात. यावेळी हजारो वाहनांच्या बेशिस्त वाहतूकीमुळे आणि पार्किंगमुळे मोठी कोंडी होते. त्यामुळे सणासुदीच्या काळात नागरिक अडकून पडतात.या अनुषंगाने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शन खाली वाहतुक नियोजन बैठकीचे आयोजन केले होते.
शहरातील मारवाड पेठेतील राजस्थान कापड दुकानात सकाळी १० वाजता बारामती शहरातील सर्व व्यापारी वर्ग, बारामती नगरपरिषदेकडील अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच वाहतूक अंमलदार आदी या संयुक्त बैठकीसाठी उपस्थित होते. दीपावली सणाच्या कालावधीत शहरात होणारी गर्दी व वाहतुक कोंडी पाहता यावर ठोस उपाययोजना आखण्यासाठी यादव यांनी पुढाकार घेतला. या बैठकीत अनेक उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.यामध्ये दीपावली कालावधीत होणाऱ्या गर्दीमुळे करावयाचे वाहतूक नियमन, वाहनांचे पार्किंग तसेच त्यावर करावयाच्या उपायोजना यावर अनेकांनी आपापली मते व्यक्त करत त्याअनुषंगाने नियोजन करण्यात आले. यावेळी वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांना सूचना केल्या. यामध्ये नागरिकांना गुणवडी चौक ते गांधी चौक तसेच भिगवण चौक ते गांधी चौकात जाण्यास हरकत नाही परंतु विरुद्ध दिशेने कोणीही जाऊ नये, संबंधित ठिकाणी एकेरी वाहतुक असल्याने त्यानुसार नियम पाळावेत, आपली वाहने पार्किंग करताना पार्किंग असेल तिथेच पार्क करावीत तसेच चारचाकी वाहने पार्किंग करीता सिध्देश्वर मंदिराजवळील व निरा नदीजवळील स्मशानभूमी जवळ असलेल्या रोडचा वापर करावा परंतु वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, आपली वाहने पार्क करण्यासाठी शक्यतो गुणवडी चौक येथील मंडई पार्किंगचा वापर करावा, लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी आपले साहित्य दुकानाबाहेर लावू नये तसेच रस्त्याच्या बाजूला बसणारे छोट्या व्यवसायिकांनी साहित्याचा पसारा न मांडता जागेचा, पार्किंगचा व वाहतुकीस अडथळा होणार नाही या बाबी लक्षात घेऊन व्यवसाय करावा, सर्व छोटे-मोठे व्यावसायिक व्यापारी व नागरिकांनी सर्व सूचनांचे पालन करून वाहतूक पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन यादव यांनी बोलताना केले. बाजारपेठेत वाहतूक नियोजनासाठी आवश्यक ते सूचनाफलक लावण्यात येणार आहेत. वाहतूक नियोजनासाठी आणखी मनुष्यबळाची मागणी करण्यात आलेली आहे. वाहतुकीचे समस्यांबाबत थेट संपर्क करण्याचे आवाहन यादव यांनी केले आहे.
सदर मिटिंग साठी व्यापारी
सुशीलकुमार सोमाणी, अध्यक्ष, बारामती व्यापारी महासंघ, सचिन बुधकर, अध्यक्ष, महावीर पथ व्यापारी असोसिएशन, जगदीश पंजाबी, सुरजीत झगडे, मनोज खुटाळे सम्यक छाजेड अक्षय छाजेड गोकुळ लोळगे आशिष ढाकाळकर अण्णा महाडिक संजय काबरा सोनिक पंदारकर हार्दिक गुजराथी यश झगडे हृषीकेश निलाखे सुनील धुमाळ – बारामती नगरपरिषद, अतिक्रमण विभाग बारामती वाहतूक शाखेचे सुभाष काळे सुधाकर जाधव प्रदीप काळे अजिंक्य कदम रेश्मा काळे माया निगडे स्वाती काजळे सीमा साबळे प्रज्योत चव्हाण असे उपस्थित होते.