दि.१६ पासून २० जाने. बारामतीत कृषिक -२०२५ ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित कृषि विज्ञान केंद्र बारामती मार्फत ‘कृषिक’ हे जागतिक स्तरावरील शेतीविषयक प्रात्याक्षिके आधारीत कृषि प्रदर्शन …..
कृषिक -२०२५
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित कृषि विज्ञान केंद्र बारामती मार्फत ‘कृषिक’ हे जागतिक स्तरावरील शेतीविषयक प्रात्याक्षिके आधारीत कृषि प्रदर्शन सन २०१५ पासुन १७० एकर प्रक्षेत्रावर दरवर्षी आयोजित केले जाते. या वर्षी दि १६ ते २० जानेवारी 202५ या कालावधीत याचे आयोजन केले आहे.
संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र पवार हे १९८० चे दशकात अमेरीकेतील मिशिगन राज्या मध्ये कृषिपदवीचे शिक्षण घेत असताना मिनिसोटा कॉन्टी (गाव) मध्ये त्यांनी अश्या प्रकारचे प्रात्यक्षिक आधारित प्रदर्शन पाहिले होते. याच संकल्पनेतून दरवर्षी हे प्रदर्शन भरविले जाते.
कृषिक २०२५ मध्ये असणार २० हून अधिक देशाचे तंत्रज्ञान :
या वर्षी नेदरलँड, चीन, अमेरिका, इस्त्राइल, ब्राझिल, स्पेन, इटली, जर्मनी, अफ्रिका, फ्रान्स, थायलंड, कोरीया, जपान, इंग्लैंड (UK), मेक्सीको, स्विडेन, तुर्कस्थान, ऑस्ट्रेलिया इत्यादि देशांतील विविध AI, सेन्सर व रोबोटिक तंत्रज्ञान बियाणे, खते, औषधे, मशिनरी, पॉलीहाउस, लागवड तंत्रज्ञान, स्मार्ट टुल्स पाहण्याची नामी संधी उपलब्ध होणार आहे. या देशातील तंत्रज्ञानामध्ये जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट आणो ऑक्सफर्ड विद्यापीठ आधारित जगातील २ नंबरचा व भारतातील एकनंबर चा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादन तंत्रज्ञान, जापनीज भाजीपाला,
जर्मनी येथील फुल पिके, जावा बेटावरील निळी केळी, जपान येथील बायोफ्लॉक यंत्रणा, नेदरलैंड धर्तीवरील भाजीपाला उत्पादन व गोवंश सुधारणा केंद्र, स्पेन, जर्मनी, थायलंड चा फणस ई. देशातील विषमुक्त शेती उत्पादनासाठी आधुनिक औषधे, सेन्सर तंत्रज्ञानावर आधारित ,जर्मनी येथील ७० प्रकारची फुल पिके, तुर्कस्थानची बाजरी, इंग्लंड, अमेरिका देशातील प्रगत मशिनरी, इस्त्राइल येथील सूक्ष्म सिंचन प्रणाली,
इटली येथील सेन्सर चलित मशिनरी तंत्रज्ञान असणार आहे.
प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे :
देशातील पहिले फार्म ऑफ द फ्यूचरची उभारणी:
मायक्रोसॉफ्ट व जगातील सर्वोत्तम ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन यांच्या सहकार्यातून – सेंटर ऑफ एक्सलंस फार्मवाइबच्या द्वारे ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता(AI), IOT, AR, VR, या सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कृषि क्षेत्रात वापर करून तंत्रज्ञान विकसित केले आहे व देशातील पहिले फार्म ऑफ द फ्यूचरची उभारणी केली आहे. जसे कि सेन्सार, ड्रोन, रोबोटीक्स, सॅटेलाईट मॅपिंग ,रिमोट सेन्सिंग इ. प्रात्यक्षिक स्वरुपात वापर ऊस पिकात केला आहे.