तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने झारी अख्तर अकबर यांना दिले आर्थिक सहाय्य
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथील इ. १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी झारी जुनेद अख्तर याचे जानेवारी २०२५ मध्ये अपघाती निधन झाले. जुनेद याची परिस्थिती अत्यंत साधारण असल्याचे महाविद्यालयाच्या निदर्शनास आल्याने प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन रक्कम जमा केली व अनेकान्त एज्युकेशन सोसायटीने देखील उर्वरित रक्कम देऊन एकूण रक्कम १ लाखाचा चेक जुनेद याचे वडील झारी अख्तर अकबर यांना दिला. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महाविद्यालयाने त्यांना आर्थिक सहाय्य केले. संस्था व महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य प्रा.डॉ.अविनाश जगताप यांनी हा चेक झारी यांना त्यांच्या घरी जाऊन सुपूर्द केला. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.अशोक काळंगे, प्रा.डॉ.सचिन गाडेकर, प्रा.डॉ.अजित तेळवे रजिस्ट्रार अभिनंदन शहा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.वैशाली माळी, को ओर्डीनेटर संजय शेंडे, प्रा.गोरखनाथ मोरे हे देखील उपस्थित होते.
जुनेद हा विद्यार्थी प्रामाणिक व कष्टाळू होता. परिस्थितीची जाण त्याला होती. त्याच्या कुटुंबास महाविद्यालयाने दिलेल्या आर्थिक सहाय्याबद्दल अख्तर झारी यांनी संस्थेस धन्यवाद दिले व अनेकान्त व टी सी परिवाराने दिलेल्या सहाय्याबद्दल ऋण व्यक्त केले.
