तुच माझी करीना…
तुच माझी रविना
तुच माझी करीना..
आज बोलली नाही स
तर मला करमेना…
सोडतेस मोकळे केस तु
दिसतेस सबसे हसीन हसीना…
कधी चुकलं माझं काही
तर असं डोळे वटारून बघतेस…
सुटतो अंगाला पसीना..
तुझ्या सौंदर्यावर तर फिदा दूनिया सारी..
लाजून जातो आईंना..
किती बसलेत टपून
हात तुझा पकडण्या..
दमछाक झाली त्यांची
तरी हाती तु कुणाच्या लागेना…
भाग्यवान मी नशीबवान मी…
माझ्या बिगर पाण्याचा घोटही तुला जाईना…
झालीस फिदा तु भोळ्या भाबड्या या माणसावर…
जसं पाखरू हेरून बसतं भरदार कणसावर…
मैत्री चे रूपांतर कधी प्रेमात झालं
माझं मलाच कळेना..
तुच माझी रविना तुच माझी करीना…
बोलली नाही स आज तर आज मला करमेना..
नितीन कुमार शेंडे
बारामती
