डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन…!

0
38

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

बारामती (प्रतिनिधी) – विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संजय भाऊ वाघमारे युवा मंचच्या वतीने बानप शाळा क्रमांक 1 ते 8 आणि शाळा क्रमांक 7 येथे वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विशाल भाऊ जाधव, रिपाइं (RPI) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील भाऊ शिंदे, बारामती तालुका रिपाइं अध्यक्ष संजय वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते नितीन भाऊ शेलार, पत्रकार मन्सूर भाई शेख, पत्रकार स्वप्निल कांबळे, पत्रकार निलेश जी. जाधव, रिपाइं मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जी. खंडाळे यांची उपस्थिती होती.

शाळा क्रमांक 2 चे प्राध्यापक सलगर सर, शाळा क्रमांक 7 चे गावित सर, शाळा क्रमांक 5 चे ढोले सर तसेच पर्यवेक्षिका ठोंबरे मॅडम, रोहित सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे आयोजन मयूर भैया मोरे आणि सुबोध वाघमारे यांनी केले. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक विचार रुजवण्यास मदत होईल, असे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here