बारामती (प्रतिनिधी) – भारताचे आद्य कृषी जनक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रम आज श्री वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या बारामती शाखेत मोठ्या भक्तिभावात आणि आदरात पार पडला.
भारत कृषक समाज संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास संघटनेचे चेअरमन प्रकाशराव मानकर, व्हाइस चेअरमन भारत बापू गावडे पाटील, संचालक शेषराव पाटील चिखलीकर, राष्ट्रवादी

काँग्रेसचे स्टार प्रचारक नितीनदादा शेंडे, ज्येष्ठ नेते मधुकरदादा होले, माधव भारसाकळे, मोहनराव गावडे पाटील, कालीदास गावडे पाटील, धोंडीराम पवार गुरुजी, तसेच संस्थेचे अधिकारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. देशमुख यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर भारत बापू गावडे पाटील यांनी संस्थेच्या विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. चेअरमन प्रकाशराव मानकर यांनी संघटनेच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

प्रमुख पाहुणे नितीन शेंडे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनकार्यावर भाष्य करत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी धोंडीराम पवार गुरुजी यांनी आभारप्रदर्शन केले.

कार्यक्रम प्रसंगी सर्वांनी डॉ. देशमुख यांना आदरांजली वाहून, त्यांच्या कार्यपर पल, मनोगत व्यक्त करण्यात आले.
