ट्रस्ट व धर्मादाय संस्थांसाठी आर्थिक अंदाजपत्रक सादर करणे अनिवार्य …!

0
14

ट्रस्ट व धर्मादाय संस्थांसाठी आर्थिक अंदाजपत्रक सादर करणे अनिवार्य …!

पुणे: नोंदणीकृत ट्रस्ट व धर्मादाय संस्थांनी पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक फेब्रुवारी अखेपर्यंत सादर करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. धर्मादाय नियम १९५१ मधील कलम १६ नुसार, ज्या धार्मिक ट्रस्टचे वार्षिक उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा अधिक आणि इतर धर्मादाय संस्थांचे उत्पन्न दहा हजारांपेक्षा अधिक असेल, त्यांना अंदाजपत्रक सादर करणे बंधनकारक आहे.

अंदाजपत्रकात संस्थेच्या आगामी आर्थिक वर्षातील उत्पन्न, खर्च, प्रशासकीय खर्च, विशेष उपक्रमांसाठी निधी नियोजन, कर्मचारी व्यवस्थापन यासंबंधी माहिती असणे आवश्यक आहे. तसेच, संस्थेच्या बँक खात्यांचे तपशील, व्याज, गुंतवणूक, प्राप्त परतावे, सरकारी योजनांमधून मिळणारा निधी याचा उल्लेख करणे गरजेचे आहे.

यासोबतच, विद्यमान विश्वस्तांची नावे आणि त्यांनी मान्य केलेल्या अंदाजपत्रकाचा ठराव जोडणे आवश्यक आहे. सर्व ट्रस्ट व धर्मादाय संस्थांनी आपल्या सल्लागार लेखापालांशी संपर्क साधून अंदाजपत्रक वेळेत दाखल करावे, अन्यथा वार्षिक लेखा परीक्षण अहवालात त्याची नोंद घेतली जाईल, असे ट्रस्ट प्रॉक्टिस असोसिएशनचे अध्यक्ष शिवराज कदम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here