ज्येष्ठ साहित्यिक व विधिज्ञ न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. त्यांच्या सहवासातील काही दिवस अविस्मरणीय ठरले… अनंत आठवणी आणि निरतिशय चर्चा… त्यांचा अकृत्रिम स्नेह अवर्णनीयच… ९६ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आपल्या लिखाणातून भारतीय स्वातंत्र्याचा काळ आणि नेतृत्व या विषयीचे त्यांचे चिंतन प्रेरणादायी असे.
कविता, कथा लिखाणाने सुरुवात करणारे नरेंद्र चपळगावकर यांनी आपले वैचारिक लिखाण कधीही दुर्बोध होणार नाही, याची काळजी घेतली होती. त्यांची एकूण ३६ पुस्तके प्रकाशित झाली होती. यामध्ये तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या वरील चिरत्रात्मक लिखाण असणारे कर्मयोगी सन्यासी, भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा या क्षेत्रातील दीपमाळ, नामदार गोखले यांच्यासह पंडित जवाहरलाल नेहरु व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयीचे कमालीचे औत्सुक्य त्यांच्यामध्ये होते. नमन त्यांना.. साप्ताहिक भावनगरी बारामतीच्या वतीनेही भावपूर्ण श्रद्धांजली