जिल्हा परिषद
बारामती पंचायत समिती निवडणूक २०२६ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रचार २४ ला शुभारंभ…
बारामती : पुणे जिल्हा परिषद अंतर्गत बारामती पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या प्रचार कार्यक्रमाचे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने बारामती तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हा प्रचार शुभारंभ कार्यक्रम शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता होणार आहे
श्री क्षेत्र कन्हेरी, ता. बारामती, येथे होणार आहे.
या कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रचाराला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.




