जितेंगे और लढेगे, सत्याचा विजय होणारच : सुप्रिया सुळे
बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने होम मिनिस्टर व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
बारामती: प्रतिनिधी
बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने विविध सामाजिक उपक्रम संपन्न करून वेगळी सामाजिक ओळख निर्माण केली आहे,तर महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम आदर्शवत आहे त्याचप्रमाणे सध्याच्या घडामोडी मध्ये लढेंगे और जितेंगे त्याचप्रमाणे सत्याचा विजय होईल असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अध्यक्ष सत्यव्रत काळे यांच्या वतीने बारामती शहरांमध्ये महिलांसाठी हळदीकुंकू व होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याच्या बक्षीस वितरण प्रसंगी सुप्रिया सुळे बोलत होत्या.
या प्रसंगी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. एस. एन. जगताप ,शहर अध्यक्ष ऍड संदीप गुजर, मा.नगरसेवक ऍड.सुभाष ढोले,मा. जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे,तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या अध्यक्षा वनिता बनकर,
शहर युवती काँग्रेसच्या अध्यक्षा प्रियंका खरतोडे व मा. नगरसेविका आरती शेंडगे,
आदी मान्यवर उपस्तीत होते.
एकल (विधवा) महिलांना सुद्धा हळदकुंकू मध्ये समाविष्ट करून घेतले पाहिजे मी त्यांचा सन्मान करते अत्याधुनिक जीवनात त्यांचा आदर करा व त्यांना सहकार्य करा असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
महिलांचे शिक्षण,विविध क्षेत्रात पदार्पण व उल्लेखनीय यश याचे श्रेय शरद पवार साहेब व आई प्रतिभा ताई यांना जाते त्यांच्या पुरोगामी विचारामुळे मी सुद्धा कणखर घडले.
सत्यव्रत काळे यांनी महिलांसाठी केलेले कार्य आदर्शवत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
आता पर्यंत घेतलेल्या कार्याचा आढावा घेऊन ,सामाजिक उपक्रम राबविताना महिलांनी दिलेली साथ यामुळे सामाजिक जीवनात यशस्वी झाल्याचे प्रास्ताविक मध्ये बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यव्रत अर्जुनराव काळे यांनी सांगितले.
प्रथम सीमा बडे, द्वितीय रोहिणी भापकर, तृतीय अंजली वणवे उत्तेजनार्थ अंकिता कुतवळ ,मयुरी शिंदे, ममता जाधव होम मिनिस्टर मधील विजेत्या व उखाणे स्पर्धा मधील नेहा गोसावी शुभांगी गालफाडे यांना सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले .
होम मिनिस्टर व हळदकुंकू कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग हे खास वैशिष्ट्य ठरले.
होम मिनिस्टर सादरीकरण श्री सावळेपाटील यांनी केले व गायन सलीम सय्यद यांनी केले.