…….जाच………

0
93

……….जाच………

घुंगुरवाळे रुढींचे
घरा दारात घुमले
बालपण तिचे
दुडदुडत गेले!…
रीत रिवाज चाळ
छुम छुमले पायी
उबरठ्याच्या बाहेर
पळायची घाई!…
उंबर-यावरती यौवनाच्या
उभी ती होती
चालीरितींचे पैंजण
पायी लेत होती!…
मुलीची जात तुझी
काचेचे भांडे
रोजच ऐकले तिने
मनात खाई मांडे!…
माप ओलांडताना ही
रीतच पुढे होती
देणीघेणी व्यवहारांची
‌ जोडवी ‌ल्याली होती!…
रुढींच्या वर्तुळातच
फिरत संसार केला
अंतरीचा आनंद
निघून तो गेला!…
सरली नाही रीत रुढी
वय सरून गेले
जगणे तसेच ‌ ते
आजही तिला आले!…
घरात बाहेर कुठेही
तीच तीच हवा
जाच हाच रुढीचा
संपायलाच हवा!…

…प्रतिभा गारटकर

इंदापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here