

जळोची येथे रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
बारामती: जळोची रमाईनगर येथे रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.या प्रसगी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे यांनी माता रमाई या त्यागाचे प्रतीक आहेत,त्यांच्या जीवनातून प्रत्यकाने प्रेरणा घेणे आवश्यक आहे असे मनोगत व्यक्त करताना सांगीतले.

यावेळी माजी नगरसेवक शैलेश बगाडे व संतोष सवाणे यांच्या हस्ते रमाईनगर नामफलकाचे अनावरण करण्यात आले.सदर कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे,माजी नगरसेक शैलेश बगाडे,संतोष सवाणे रमाईनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन रमाईनगर येथील सुर्यकांत देवकाते,रमेश सरोज,नंदलाल सरोज,नामदेव जगताप,बाळु चव्हाण,संतोष सरोदे,तुकाराम टेंगल,बादशहाभाई शेख,किशोर मदने,बाबु भोसले,दिपक शिंदे यांच्या वतीने करण्यात आले होते.
