अरे कोण म्हणते जिंकणार नाही जिंकल्याशिवाय राहणार नाही…. चक दे इंडिया …!
भारत बनाम न्युझीलंड – चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अंतिम सामना – ऐतिहासिक लढतीसाठी सज्ज!
दुबई, 6 मार्च 2025: 2013 नंतर प्रथमच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघासमोर आता. न्युझीलंड संघाचे आव्हान असणार आहे. 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणारा हा महामुकाबला क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरण्याची शक्यता आहे.
दमदार कामगिरी करत भारतीय संघ अंतिम फेरीत

भारतीय संघाने अलीकडेच झालेल्या सेमीफायनलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. विराट कोहलीच्या शानदार खेळीमुळे भारताने अंतिम फेरी गाठली. मोहम्मद शमीच्या अचूक गोलंदाजीनेही संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
महासंग्रामाची तयारी….

भारत आणि. न्युझीलंड या दोन संघांमध्ये अंतिम सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे. न्युझीलंडचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, पण भारतीय संघानेही आपल्या तगड्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, के. एल. राहुल आणि मोहम्मद शमी हार्दिक पांड्या, अक्षर पटेल रवींद्र जडेजा श्रेयश अय्यर सारखे नव्या आणि जुन्या रक्ताचे तगडे खेळाडू असलेल्या भारतीय संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
क्रिकेटप्रेमींसाठी यादगार सामना होणार!
भारतीय संघ चॅम्पियन चषक ट्रॉफीवर आपले नाव कोरण्याच्या तयारीत आहे. हा सामना जोशपूर्ण आणि उत्कंठावर्धक ठरणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष आता 9 मार्चच्या या ऐतिहासिक सामन्याकडे लागले आहे.
भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी भावनगरी च्या वतीने हार्दिक शुभेच्छा!
