ग्राहकांसोबतचा सकारात्मक संवाद व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त ठरतो – शशांक मोहिते.
प्रतिनिधी – बारामती बिजनेस चौक या माध्यमातून बारामती मधील व्यवसायिकांसाठी एक व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. बारामती परिसरातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांपासून सर्वच क्षेत्रातील लोकांचा यामध्ये समावेश आहे. “बीबीसी” च्या माध्यमातून वेगवेगळी चर्चासत्रे आयोजित केली जातात. संवाद तीन या चर्चासत्रामध्ये शशांक मोहिते, सुप्रसिद्ध भाषण कला व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक यांनी व्यवसायातील ग्राहकांचा सुसंवाद या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की सकारात्मक सुसंवाद ही एक कला आहे आणि त्यातूनच आपण अधिक ग्राहक जोडून आपला व्यवसाय वाढवू शकतो. संवादातील व्हेरिएशन असो किंवा समोरच्या ला काय हवं आहे हे त्याच्याकडून बोलत करून त्याला उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रोजच्या ग्राहकांसोबत होणारा संवाद हा सकारात्मक असेल तर तो ग्राहक कायमस्वरूपी आपला होऊन अप्रत्यक्षरीत्या व्यवसाय वाढीसाठी मदत करतो.
हा कार्यक्रम मोतीबाग इंदापूररोड बारामती येथील अन्नपूर्णा हॉटेल मध्ये शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता घेण्यात आला होता. कार्यक्रमामध्ये महिला व्यवसायिकांचा देखील सहभाग होता. या कार्यक्रमासाठी दौंड, कुरकुभ, भिगवन, फलटण, बारामती परिसरातील 67 व्यवसायिकांनी व नव उद्योजकांनी सहभाग नोंदवला.