गुणवंत विद्यार्थी व समाजरत्नांचा सन्मान सोहळा: महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा स्तुत्य उपक्रम
पुणे: महाराष्ट्र नाभिक महामंडळ, पुणे जिल्हा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा समितीच्या वतीने दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी ग. दि. माडगूळकर प्रेक्षागृह, निगडी, प्राधिकरण येथे नाभिक समाजातील शैक्षणिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक दिनांक २५ जानेवारी २०२५ पर्यंत ९८५०८५८८९६ या क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय कल्याणजी दळे साहेब भूषवणार असून, प.पू. सद्गुरु माऊली महाराज वाळुंजकर यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थी व समाज बांधवांचा सत्कार होईल.
विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत आयोजित करण्यात येत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व स्नेहभोजन दिले जाते, तसेच पुरस्कार व कार्यक्रमासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा फी आकारली जात नाही. हा संपूर्ण खर्च समितीच्या सदस्यांनी आपल्याच खिशातून केला असून, समाजातील बांधवांसाठी हा आदर्शवत उपक्रम राबवला जातो.
कार्यक्रमाचे प्रमुख पदाधिकारी आणि आयोजकांमध्ये अध्यक्ष श्री. अरुण शेठ ढमाले, उपाध्यक्ष श्री. हेमंत भालेकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. अशोक नारायण मगर, युवक अध्यक्ष श्री. सुनिल वाळुंज, समिती सदस्य श्री. आदिनाथ गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. रमेश राऊत, कोषाध्यक्ष श्री. तानाजी वाळुंजकर, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. अंकुश जाधव, उपाध्यक्ष श्री. भाऊसाहेब यादव, सहसचिव श्री. तेजस पंडित, सचिव श्री. नितीन कुटे, युवक उपाध्यक्ष श्री. पंकज व्यवहारे, संघटक श्री. संपत ताटे, श्री. बळीराम मंडलिक, श्री. श्रीहरी जाधव, श्री. चंद्रकांत मोरे, श्री. गजानन वाशिमकर, श्री. नितीन भाऊ पंडित यांचा समावेश आहे.
महिला नेतृत्वात सौ. अनिता ताई मगर या महिला अध्यक्षपद भूषवत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचा दर्जा उंचावला आहे.
विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाला नेहमीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि समाजातील एकता व प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांच्या यशाचा सन्मान होतो, हे या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
कार्यक्रमाला समाजबांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.