कृषी यांत्रिकीकरण सोडतीबाबत अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन
पुणे, दि. 28: कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण सोडतीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहायक आदींकडे अभिप्राय नोंदवावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.
यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेची सद्याची सोडत पद्धत योग्य आहे किंवा कसे ? सोडत पद्धत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या पद्धतीची असावी असे वाटते का ? प्रचलित सोडत पद्धत आणि ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ यापैकी कोणती सोडत पद्धत प्राधान्याने राबवावी तसेच या अनुषंगाने शेतकऱ्यांकडे काही नवीन अभिप्राय असल्यास त्याबाबतही अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन श्री. काचोळे यांनी केले आहे. हे अभिप्राय कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडेही नोंदवावेत, असेही कळविण्यात आले आहे.