
कृषिक प्रदर्शनाचा समारोप …
बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचा आज सोमवार दि. २० जानेवारी रोजी समारोप करण्यात आला.
या वेळेस श्वान, दुग्ध उत्पादन, देशी गोवंश स्पर्धेतील विजेत्यांना ट्रस्टचे चेअरमन मा. श्री. राजेंद्र पवार, हिंदुस्थान फिडचे जनरल मॅनेजर श्री. अजय पिसाळ, केव्हीके बारामतीचे विषय विशेषज्ञ डॉ. रतन जाधव, युवा उद्योजक महेश गुळवे यांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आले.

श्वान स्पर्धा – विजेत्याचे नाव व बक्षिसाचे स्वरूप
१. टॉय ब्रीड –
प्रथम क्रमांक – श्री. आकाश मोरे, शारदानगर, रु. ५०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक
द्वितीय क्रमांक – श्री. अजिंक्य मोरे, शारदानगर , रु. ३०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक
तृतीय क्रमांक – श्री. आदित्य जाधव, बारामती, रु. २०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक
२. इंडियन ब्रीड –
प्रथम क्रमांक – श्री. अर्जुन आढाव, कटफळ, रु. ५०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक
द्वितीय क्रमांक – श्री. कैलाश किर्वे, बारामती , रु. ३०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक
तृतीय क्रमांक – श्री. आदित्य जाधव, बारामती, रु. २०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक
३. वर्किंग ब्रीड –
प्रथम क्रमांक – श्री. नकुल शिंदे , रु. ५०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक
द्वितीय क्रमांक – श्री. गौरव नलावडे, रु. ३०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक
तृतीय क्रमांक – श्री. अक्षय दळवी, रु. २०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक
देशी गोवंश गाय वर्ग स्पर्धा – श्री. बालाजी केंद्रे, लातूर (लाल कंधारी गाय ), श्री. वैभव केंद्रे , लातूर (देवणी गाय), श्री. धनाजी पाटील, राधानगरी, कोल्हापूर (कॉंन्क्रेज गाय) यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
हिरकणी कालवडी स्पर्धा –
प्रथम क्रमांक – श्री. रोहित घाडगे, सांगोला , रु. ३१०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक
द्वितीय क्रमांक – श्री.केतन शिंदे ,अन्थुरणे, रु. २१०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक
तृतीय क्रमांक – श्री. सागर चव्हाण, पंढरपूर, रु. ११०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक
दुग्ध गाय स्पर्धा – या स्पर्धेमध्ये एच. एफ. गाईंचे रोज दुध काढले जात होते व त्या आधारावर विजेत्यांची निवड करण्यात आली.
प्रथम क्रमांक – श्री. हरीश येडे , येडेवाडी, दौंड , रु. ५१०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक (४३ लि. प्रती दिन )
द्वितीय क्रमांक – श्री.अविरत पानसरे ,बारामती, रु. ४१०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक (४२ लि. प्रती दिन )
तृतीय क्रमांक – श्री. गणेश होळकर , सादोबाची वाडी, बारामती, रु. ३१०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक (३७.६ लि. प्रती दिन )
श्री. अमित शिंदे, उरुळीकांचन यांच्या कमांडो या दीड टन वजनाच्या रेड्याला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
या सर्व स्पर्धेची बक्षिसे बारामती अॅग्रो ली. मार्फत पुरस्कृत करण्यात आली होती तसेच हिंदुस्थान फीड कंपनी मार्फत सर्व विजेत्यांना पशुखाद्याचे कीट वाटप करण्यात आले.
कृषिक २०२५ हे दहावे कृषी प्रदर्शन नाविन्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण तसेच गेल्या दहा वर्षातील रेकॉर्ड ब्रेक शेतकरी सहभागाचा उच्चांक गाठणारे ठरले. संस्थेचे चेअरमन मा. श्री. राजेंद्र पवार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांनी सर्व सहभागी कंपन्या, स्टॉल धारक, केव्हीकेचे व संस्थेचे सर्व कर्मचारी,विद्यार्थी, वोलांटिअर व सहभागी शेतकरी बंधू यांचे विशेष आभार मानले व पुढील कृषीक २०२६, दि. १५ ते १९ जानेवारी साठी शुभेच्छा दिल्या.