“कारभारी प्रीमियर लीग २०२४” बारामती
कारभारी प्रीमियर लीग २०२४ आयोजित आजचा सातवा दिवस. “सी” गटातील साखळी सामन्यांना सुरुवात. या गटातील सर्व संघातील खेळाडू प्रथितयश व नामांकित असे आहेत.त्यामुळे बारामती करांना अति उच्च दर्जाचे क्रिकेट खेळाचे सामने पाहण्याची पर्वणीच असणार आहे.
आज झालेला पहिला सामना एमईएस पुणे विरुद्ध मेवरिक्स बाॅईज पुणे या दोन संघामध्ये झाला. मेवरिक्स बाॅईज पुणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एम ईएस पुणे संघाने १९.५ षटकात सर्व बाद १४३ धावा केल्या.यात राहूल देसाई याने ४० चेंडूत ५२ धावा केल्या.(४४ व ६२)
मेवरिक्स बाॅईज पुणे संघाकडून मनोज यादव,अब्दुस सलाम,हरी सावंत, हर्षल हडके यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
मेवरिक्स बाॅईज पुणे संघाने या धावा १५.२ षटकात केवळ एक गड्याच्या मोबदल्यात १४४ धावा करुन हा सामना ९ गडी राखून आरामात जिंकला.यात पवन शहा याने आक्रमक अशी फलंदाजी करत केवळ ४४ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या.यात पवने ५ उत्तुंग असे षटकार मारले तर ओम भोसले याने २६ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या.
सामना वीराचा किताब पवन शहा यास मिळाला.
आजच्या दिवसातील दुसरा सामना मेवरिक्स बाॅईज पुणे व माणिकचंद ऑक्सिरीच पुणे या दोन संघामध्ये झाला. मेवरिक्स बाॅईज पुणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १९४ धावा केल्या.यात सुरज शिंदेने आक्रमक अशी फलंदाजी करत केवळ १९ चेंडूत ४१ धावा केल्या यात त्याने ४ षटकारा बरोबर २ चौकार देखील लगावले.तर पवन शहाने सुद्धा आक्रमक फलंदाजी करत २३ चेंडूत ४० धावा केल्या यात त्याने ३ षटकार व ४ चौकारांची आतिषबाजी केली.
या धावांचा पाठलाग करताना माणिकचंद ऑक्सिरीच पुणे संघ २० षटकात १७८ धावाच करु शकला.यात अनिकेत पोरवाल याने ३८ चेंडूत ६१ धावा केल्या यात त्याने ६ चौकार व २ षटकार लगावले. मेवरिक्स बाॅईज पुणे संघाचा कर्णधार हरी सावंत याने ३४ धावात ३ गडी बाद केले.
हा सामना मेवरिक्स बाॅईज पुणे संघाने १६ धावांनी जिंकला.
सामनावीर म्हणून हरी सावंत यास घोषित केले.
Home देश - विदेश कारभारी प्रीमियर लीग २०२४” बारामती स्पर्धेतून क्रिकेट रसिकप्रेमीसाठी ठरतेय मेजवानी….