HomeUncategorizedकळंब / निमसाखर येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी....

कळंब / निमसाखर येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी….

ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वालचंद विद्यालय व जुनियर कॉलेज कळंब येथे आज दिनांक 26 जून 2024 रोजी, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वालचंद विद्यालय कॉलेजचे प्राचार्य, सर्वगोड सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष रुपनवर एमडी, जूनियर विभाग प्रमुख सावंत सर, ज्येष्ठ शिक्षक अर्जुन सर उपस्थित सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते,
छत्रपती शाहू महाराजांनी समाजामध्ये केलेल्या कार्याचा उल्लेख, त्यामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी समाजासाठी आपल्या 48 वर्षाच्या हयातीमधील सर्व वेळ हा समाजाच्या हितासाठी खर्च केला, दीनदलित,अस्पृश्य समाजाच्या, समस्या सोडवण्यासाठी, कोल्हापूर संस्थानांमधील केलेले अमुलाग्र बदल यामध्ये प्रामुख्याने राधानगरी धरण असेल, कुस्तीमध्ये प्रामुख्याने असलेली कोल्हापूरची ओळख, अशा छत्रपती शाहू महाराजांच्या विविध कार्याचा उजाळा आज कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यालयाचे प्राचार्य सर्वगोड सर यांनी मांडला,


यावेळी अनेक विद्यार्थ्यांची मनोगते देखील झाली,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख गायकवाड मॅडम यांनी केले, कार्यक्रमाचे प्रस्ताविक हे हिप्परकर मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोळ सर यांनी केले..

निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे, एन. ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे, येथे आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 150 वी जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. त्यावेळी यशवंत विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन, आदरणीय नंदकुमार सूर्यकांत रणवरे पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

त्यावेळी सन्माननीय प्राचार्य चंद्रकांत रणवरे सर पर्यवेक्षक मधुकर खरात सर , कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे सर सचिन रणवरे सर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्था सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपण सर्वांनी महापुरुषांचे विचार आत्मसात केले पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले. मधुकर खरात सर, सोमनाथ चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व ,विचारधारा याबद्दलची माहिती पटवून दिली. प्रमोद चव्हाण सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सांस्कृतिक विभागाने कार्यक्रमाचे आयोजन केले.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on