कलाकार कट्टा – बारामती मध्ये
नटराज कला दालन लगत कॅनॉल सुशोभिकरण जागे मध्ये कलाकार कट्टा ही संकल्पना कार्यान्वीत करण्यात आली आहे. रविवार दिनांक २ जून पासून या योजनेचा शुभारंभ होत आहे. दर रविवारी सायंकाळी ५.३० ते रात्री ८.०० पर्यंत नागरिकांना येथे लाभ घेता येणार आहे.
या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींची मुलांची व्यंगचित्र पेंटिंग, निसर्ग चित्र, टॅटू काढणे, पेन्सिल स्केच, पॉटरी (मातीकाम), मातीची भांडी तयार करण्यास शिकवणे, कार्टून बनविणे, फोक आर्ट, नावापासून गणपती तयार करणे, ग्लास पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, कॅलीग्राफी, वारली ग्रिटिंग, पोट्रेट, ही सशुल्क करण्यात येणार आहे. या कलाकार कट्ट्यामध्ये स्थानिक कलाकार, प्रशिक्षक, व्यावसाईक कलावंत असे सुमारे १५ कलाकार सहभागी होत आहेत.
नटराज कलामंदिर लगत कॅनॉल रस्त्यावर नागरीक फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यांना या ठिकाणी विविध कला प्रकारांचा लाभ घेता यावा म्हणून हा कट्टा सुरु करीत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली.