कर्करोग दिनानिमित्त मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन…!
पुणे/बारामती : कर्करोग दिनानिमित्त मेहता मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयू आणि भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मेहता हॉस्पिटल येथे होणार आहे.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग निदानासाठी आवश्यक असलेल्या तपासण्या, पॅप स्मिअर, सोनोग्राफी, एमआरआय, सीटी स्कॅन यांसारख्या सुविधांचा लाभ घेता येईल. तसेच महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रियांची देखील सुविधा दिली जाणार आहे.
कर्करोगाच्या विविध प्रकारांसाठी लक्षणांचे निदान व उपचार यासाठी हे शिबिर महत्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. निखिल मुथा (9890265918) किंवा श्री. पंकज गादिया (8999593818) यांच्याशी संपर्क साधावा…