‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत स्थापित ‘राष्ट्रीय सरपंच संसद’ व ‘महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन’ यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच ‘महाराष्ट्र राज्य – सरपंच – ग्रामसेवक परिषदे’ चे पुण्यात आयोजन.
सातारा येथे आज 13 जूलै 24 रोजी आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन’ च्या अधिवेशनात राज्यातील पदाधिकाऱ्यांसमोर ‘महाराष्ट्र राज्य – सरपंच – ग्रामसेवक परिषदे’च्या संकल्पनेचे श्री. योगेश पाटील यांचे सादरीकरण.
01.ग्रामपंचायतीत लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांच्यात गावविकासासाठी सुसंवाद असणे गरजेचे आहे.
सरपंच आणि ग्रामसेवक ही दोन ग्रामविकासाची दोन चाके आहेत.हा सूत्रविचार समोर ठेवून ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत स्थापित ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ व ‘महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एमआयटी, पुणे’ येथे लवकरच ‘महाराष्ट्र राज्य – सरपंच – ग्रामसेवक परिषदे’ चे आयोजन करण्यात येत आहे.
02.’राष्ट्रीय सरपंच संसदे’ चे प्रमुख समन्वयक श्री.योगेश पाटील व सहसमन्वयक
श्री.प्रकाशराव महाले यांनी 27 जून 24 रोजी ‘महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन’ चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री.संजीवजी निकम यांची चाळीसगाव (जि.जळगाव)येथे विशेष भेट घेऊन ‘सरपंच – ग्रामसेवक परिषदे’च्या आयोजनासंदर्भात सविस्तर चर्चा केली होती
.
‘महाराष्ट्र राज्य – ग्रामसेवक यूनियन’च्या नाशिक शाखेचे सरचिटणीस आणि ‘सरपंच संसदे’चे हितचिंतक स्नेही श्री.संजयजी गिरी हे यावेळी समवेत होते.
03.’राष्ट्रीय सरपंच संसदे’ चे सर्व राज्य व विभाग स्तरीय पदाधिकारी व ‘महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन’चे राज्य अध्यक्ष आणि सर्व राज्य व जिल्हा स्तरीय पदाधिकारी यांची एकत्रित मिटिंग ‘एमआयटी,पुणे’ येथे लवकरच आयोजित करून ‘राज्यस्तरीय सरपंच – ग्रामसेवक परिषदे’चे नियोजन करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले होते.
04.आज दि.13 जुलै 24 रोजी सातारा येथे ‘महाराष्ट्र राज्य – ग्रामसेवक युनियन’च्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते . या अधिवेशनास उपस्थित राहून श्री.योगेश पाटील यांनी एका विशेष सत्रात ‘महाराष्ट्र राज्य – सरपंच – ग्रामसेवक परिषदे’ची संकल्पना विस्ताराने मांडली व या संकल्पनेच्या नियोजनासाठी ‘एमआयटी,पुणे’ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकीसाठी ‘ग्रामसेवक युनियन’ च्या राज्य व जिल्हा स्तरीय पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले.
‘राष्ट्रीय सरपंच संसदे’चे सहसमन्वयक श्री. प्रकाशराव महाले, सातारा जिल्हा अध्यक्ष श्री.विक्रमसिंह जाधव व पत्रकार सौ. मिलिंदा जाधव, ग्रामसेवक यूनियन च्या नाशिक विभाग महिला संघटक डॉ.सौ.ज्योतीताई शिंदे – केदारे हे यावेळी त्यांच्या समवेत होते.
05.महाराष्ट्र राज्य – ग्रामसेवक यूनियन’च्या नाशिक शाखेचे सरचिटणीस आणि ‘सरपंच संसदे’चे हितचिंतक स्नेही श्री.संजयजी गिरी यांनी यावेळी सर्वांचे स्वागत केले.
राज्य अध्यक्ष श्री. संजीवजी निकम यांनी ‘महाराष्ट्र राज्य – सरपंच – ग्रामसेवक – संसद’ या संकल्पनेचे प्रास्ताविक केले व ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ बरोबर ‘महाराष्ट्र राज्य – ग्रामसेवक युनियन’ संयुक्तपणे भरीव कार्य करील असा विश्वास व्यक्त केला.