एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामतीचा 15 वा वर्धापन दिन साजरा
बारामती: बारामतीच्या लाडक्या खासदार सुनेत्रा (वहिनी )पवार पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया (ईएफआय)’ या संस्थेचा 15 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेने पर्यावरण रक्षणासाठी राबवलेल्या उपक्रमांमध्ये वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा, पाणी संवर्धन, आणि जनजागृती कार्यक्रमांचा समावेश आहे.
या प्रसंगी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली. विविध उपक्रमांद्वारे शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरिक, आणि सामाजिक संस्थांना पर्यावरण संरक्षणासाठी एकत्रित केले गेले आहे.
आजवर विविध मान्यवरांनी एन्व्हायरमेंटल फोरम इंडिया बारामतीच्या कार्याची संस्थेच्या कार्याची अनेकांनी प्रशंसा केली आणि भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
ईएफआय बारामतीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने काम करत असून, समाजात पर्यावरणप्रेमी विचार रुजवण्याचा संस्थेचा उद्देश आहे. भावनगरी परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा
