उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषि विभागाचा सन्मान

0
210

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषि विभागाचा सन्मान

पुणे दि.१२: पानी फाऊंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२२’च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषि विभागाचा पानी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमात सहकार्याबद्दल सन्मान करण्यात आला.

कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांचा यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला पानी फाऊंडेशनचे संस्थापक चित्रपट अभिनेते आमीर खान आणि किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ आदी उपस्थित होते.

कृषि विभागाने पानी फाऊंडेशनच्या स्थापनेपासून विविध उपक्रमात सहकार्य केल्याचे यावेळी आमिर खान यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here