उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. रायकर यांच्या वतीने सत्कार
आळंदी (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. आळंदीचे नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण, डॉ. विकास थोरवे, माऊली घुंदरे, रवी कदम उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार श्री. अर्जुन मेदनकर यांनी आभार मानले.

